विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारमधील खगरिया जिल्ह्यात झालेल्या बॉम्बस्फोटात 14 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये चार मुलांचाही समावेश आहे. स्फोटात जखमी झालेल्या दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. 14 injured in hut bomb blast in Bihar There were small bombs in the trash can
घटनेची माहिती मिळताच एसपी अमितेश कुमार काही पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे एसपींनी सांगितले.अमितेश कुमार यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार एकूण तीन स्फोट झाले. त्यापैकी दोन कमी तीव्रतेचे होते. एका प्रत्यक्षदर्शीने दावा केला की, २०-२३ छोटे बॉम्ब जमिनीवर पडल्यानंतर मोठा स्फोट झाला.
बॉम्बस्फोटात हे लोक जखमी झाले आहेत. मंगल सदा यांचा ५ वर्षीय मुलगा साजन कुमार, अशोक सदा यांचा ८ वर्षांचा मुलगा राजा कुमार, दिनेश सदा यांचा मुलगा टिक्कू कुमार, अशी जखमींची नावे आहेत. मंगल सदा यांचा मुलगा अर्जुन सदा, अशोक सदा, पुलिस सदा यांचा मुलगा सतीश सदा आणि छोटू सदा याची पत्नी बिजली देवी आणि श्रवण कुमारचा मुलगा सुदर कुमार हेही जखमी झाले आहेत.
बातमीनुसार, फलेश्वर सदा हा कचरा वेचण्याचे काम करतो. बखरी बसस्थानकाजवळील झोपडपट्टीत तो राहतो. नेहमीप्रमाणे तो कचरा वेचण्यासाठी बाहेर पडला. कचरा उचलताना त्याला एक कार्टून, खोके सापडले. ते त्याने आपल्यासोबत घरी नेले.
त्याने झोपडीत बाॅक्स टांगला. मात्र वजन जास्त असल्याने कार्टून जमिनीवर पडून स्फोट झाला.झोपडपट्टीत राहणारे डझनहून अधिक लोक जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित स्थानिक लोकांनी सांगितले की, तेथे चार स्फोट झाले. लोकांनी सांगितले की पहिला स्फोट हलक्या आवाजाचा होता, पण शेवटचा स्फोट खूप मोठा होता.
14 injured in hut bomb blast in Bihar There were small bombs in the trash can
महत्त्वाच्या बातम्या
- शेतीला आधुनिक करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव तरतुदी, पंतप्रधानांची माहिती
- नवाब मलिक यांची उस्मानाबाद जिल्ह्यात दीडशे एकर जमीन, सिलिंगची जमीन घेताना घेतली नाही परवानगी
- किरीट सोमय्यांनी जाहीर केलेले डर्टी डझन कोण? शिवसेनेच्या पाच जणांनंतर अजित पवारांचा नंबर
- वादळामुळे बोट उलटून १६ जण बेपत्ता
- भारताच्या लस कार्यक्रमाचे बिल गेटस यांनी केले कौतुक