विशेष प्रतिनिधी
कानपुर : कोरोणाची जीवघेणी दुसरी लाट येऊन गेली. आता तिसरी लाट येण्याची शक्यता देखील आहे. त्याआधीच दिल्लीमध्ये स्वाइन फ्ल्यू या व्हायरसने पुन्हा थैमान घातले आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये झिका या व्हायरसची 14 लोकांना लागण झाली आहे.
14 infected with Zika virus in Kanpur
झिका विषाणू एडिस एजिप्ती प्रजातीच्या डासांमुळे पसरतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार एडिस डास हे दिवसा चावतात. याच डासांमुळे डेंग्यू आणि चिकनगुनियासारखे आजार देखील पसरतात. हा विषाणू तसा जीवघेणा नाहीये पण गर्भवती महिलांसाठी आणि त्यांच्या भ्रूणांसाठी मात्र हा धोकादायक ठरू शकतो.
उत्तरप्रदेशमध्ये 14 लोकांना या व्हायरसची लागण झालेली आहे. यामध्ये एका गर्भवती महिलेचा देखील समावेश आहे. शहरामध्ये आत्तापर्यंत या विषाणूची बाधा झालेल्या लोकांची संख्या 25 इतकी आहे. परिस्थिती अजून बिघडण्या आधीच जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. मोठ्या संख्येने वाढणारी रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी यामध्ये बैठकीत चर्चा करण्यात येईल. कानपूर शहरातल्या चकेरी भागामध्ये जास्तीत जास्त रुग्ण आढळून आले आहेत.
या विषाणुची लक्षणे साधारण डेंग्यू सारखीच असतात. हा विषाणू डेंग्यू पेक्षा अधिक धोकादायक आणि जीवघेणाही ठरू शकतो.
उत्तर प्रदेशमधील कानपूरमधील काशीराम रूग्णालयांमध्ये झिका विषाणूची बाधा झालेल्या लोकांवर उपचार केले जात आहेत. त्या पेशंटसाठी एक वेगळा वॉर्ड देखील बनवण्यात आला आहे. प्रशासन या विषाणूची लागण रोखण्यासाठी जास्तीत जास्त महत्त्वाची पावले उचलली जाणार आहेत.
14 infected with Zika virus in Kanpur
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान