दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेश, राजस्थानसह तीन राज्यांमध्ये वेगाने कारवाई केली
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आज दहशतवाद्यांविरोधात ( terrorists ) वेगवान कारवाई केली आहे. पोलीस पथकाने राजस्थान आणि यूपी एसटीएफच्या मदतीने वेगवेगळ्या ठिकाणांहून अल कायदाच्या 14 दहशतवाद्यांना अटक केली.
दहशतवाद्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी राजस्थानमधील भिवडी येथून सहा दहशतवाद्यांना आणि झारखंड आणि यूपीमधून आठ दहशतवाद्यांना अटक केली आहे, म्हणजे एकूण 14 दहशतवादी.
पोलिसांनी सांगितले की, अल कायदा मॉड्यूलशी संबंधित 14 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. संशयित वेगवेगळ्या राज्यातील होते, ज्याचा म्होरक्या डॉ इश्तियाक हा झारखंडचा होता. सध्या ठिकठिकाणी छापेमारी सुरू असून आणखी अटक होण्याची शक्यता आहे.
अनेक ठिकाणाहून शस्त्र, दारूगोळा, साहित्य आदी जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई सुरू असून आतापर्यंत एकूण 17 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
14 Al Qaeda terrorists arrested
महत्वाच्या बातम्या
- Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील फार्मा कंपनीच्या प्लांटमध्ये भीषण स्फोट, 15 ठार, 40 जखमी
- Lakda shetkari Yojana : लाडक्या बहिणींच्या पाठोपाठ महाराष्ट्रात लाडका शेतकरी योजना; मुख्यमंत्र्यांची घोषणा!!
- Madhya Pradesh : ‘या’ राज्यातील राज्यसभा निवडणुकीच्या तारखांमध्ये झाला बदल!
- Champai Soren : चंपाई सोरेन यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची केली घोषणा!