वृत्तसंस्था
नवी दिल्ली : परदेशात आणि विविध बेटांवर कंपन्या खोलून त्याद्वारे 2600 कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या IREO रियल इस्टेट कंपनीचा मालक आणि व्यवस्थापकीय संचालक ललित गोयल यांची 1317.30 रुपयांची चल आणि अचल संपत्ती सक्तवसुली संचलनालय अर्थात ED ने जप्त केली आहे. कायदेशीर दृष्टीने ही तात्पुरती जप्ती दाखवली आहे. 1317.30 assets of Lalit Goyal arrested in Rs 2600 crore scam seized
2600 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात ललित गोयल यांना ते पळून जात असताना ईडीच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावरच अटक केली होती. 15 नोव्हेंबर 2021 रोजी ही घटना घडली होती. ललित गोयल यांच्या रियल इस्टेट कंपनीचे हरियाणा गुडगाव तसेच दिल्ली परिसरात वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत. ललित गोयल यांच्या बहिणीचा विवाह भाजपचे नेते सुधांशू मित्तल यांच्याशी झाला आहे.
ललित भोईर यांनी ब्रिटिश व्हर्जिन आयलँड, मॉरिशस अशा बेटांवर विविध कंपन्यांमध्ये भारतीय कायद्याचे उल्लंघन करून तब्बल 2600 कोटी रुपयांची संपत्ती ललित गोयल यांनी पाठवली. इतकेच नाही तर पँडोरा पेपर्स नुसार ललित गोयल यांनी 7.7 मिलियन संपत्ती प्रदेशात पाठवली आहे.
ललित गोयल यांच्या ईडीने जप्त केलेले संपत्तीमध्ये IREO रियल इस्टेट कंपनीच्या असोसिएटेड एन्टिटीज त्यांच्या अनेक व्यवस्थापकांच्या संपत्ती जमीन कमर्शियल प्लॉट्स ऑफिसेस निवासी घरे आणि बँक अकाउंट यांचा समावेश आहे.
1317.30 assets of Lalit Goyal arrested in Rs 2600 crore scam seized
महत्वाच्या बातम्या
- तुर्कीतील कोळसा खाणीत मोठा स्फोट : 22 जण ठार, अनेक जण अडकल्याची भीती, बचाव कार्य सुरू
- गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा का जाहीर झाल्या नाहीत, निवडणूक आयोगाने दिले हे उत्तर..
- दोनदा भाजपबरोबर आयाराम – गयाराम करणारे नितीश कुमार म्हणाले, “भाजप बरोबर कधीच जाणार नाही”!!
- सरकारी नोकरीची संधी : SSC अंतर्गत ९९० पदांसाठीची भरती; करा ऑनलाईन अर्ज