विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : अफगाणिस्तानमधून सुटका केलेल्या आणि जोखमीची भीती असलेल्या अफगाणी नागरिकांना तात्पुरत्या काळासाठी शरण देण्याटस १३ देशांनी मान्यता दिली आहे. 13 countries will give space to afghan people
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन म्हणाले, ‘‘ज्या संभाव्य अफगाणी शरणार्थींच्या पुनर्वसनाची व्यवस्था अमेरिकेत झालेली नाही अशांना अल्बानिया, कॅनडा, कोलंबिया, कोस्टारिका, चिली, कोसोव्हो, उत्तर मॅसेडोनिया, मेक्सिको, पोलंड, कतार, रवांडा, युक्रेन आणि युगांडा या देशांनी निर्वासितांना आसरा देण्याची तयारी दाखविली आहे. ‘ट्रान्झिट’ देशांमध्ये बहारीन, ब्रिटन, डेन्मार्क, जर्मनी, इटली, कझाकिस्तान, कुवेत, कतार, तुर्कस्तान, संयुक्त अरब अमिरात आणि उझबेकिस्तान यांचा समावेश आहे.’’
विदेशातील अमेरिकी नागरिकांच्या सुरक्षा व संरक्षणापेक्षा आमच्यासाठी इतर कशालाही महत्त्व नाही. तसेच अन्य सहकारी देश व धोक्यात असलेल्या अफगाणी नागरिकांसाठी आम्ही आमची जबाबदारी पेलण्यास कटिबद्ध आहोत, असे त्यांनी सांगितले.
13 countries will give space to afghan people
महत्त्वाच्या बातम्या
- केबी, छोटू आणि मनोज ४३ वर्षांनंतर पुन्हा आले एकत्र… कधी… कुठे…कसे…??
- “गोमूत्र शिंपडण्यापेक्षा रोजगार निर्माण करा”, नारायण राणे यांची शिवसेनेवर जोरदार टीका
- टोकियो पॅरालिम्पिक 2021: टोकियोमध्ये तिरंगा फडकवण्यासाठी भारतीय खेळाडू हतबल, कोणी पाय गमावला तर कोणी अर्धांगवायूवर मात केली
- तालिबानने ७२ अफगाणी शीख आणि हिंदूंना विमानात चढण्यापासून रोखले : रिपोर्ट