वृत्तसंस्था
नवी दिल्ली – देशातील ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील कोरोनाच्या ऍक्टीव केसेस ५० टक्क्यांनी घटल्या असून गेल्या आठवडाभरात ऍक्टीव केसेसचा आकडा दोन लाखांच्या बराच खाली म्हणजे १ लाख २७ हजारांपर्यंत खाली आला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव लव आगरवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोरोनाची ही घटती आकडेवारी कोरोनाचा फैलाव कमी होत असल्याची निदर्शक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 1,27,000 cases have been reported in the last 24 hours. Since May 28, the country is reporting less than 2 lakh cases
सध्या दर आठवड्याला २० लाख चाचण्यांचे प्रमाण ठेवण्यात आले आहे. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाणही ९२ टक्क्यांवर आहे. ही दिलासादायक बाब असल्याचे आगरवाल यांनी सांगितले. देशातील लसीकरणाची आकडेवारी त्यांनी यावेळी मांडली. देशात आतापर्यंत लसीचे २१ कोटी दिले गेले आहेत. यापैकी १ कोटी ६७ लाख डोस आरोग्य कर्मचाऱ्यांना, २ कोटी ४२ लाख डोस फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना, १५ कोटी ४८ लाख डोस ४५ वयोगटाच्या पुढच्या नागरिकांना, तर २ कोटी ३० हजार डोस १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना देण्यात आल्याची आकडेवारी त्यांनी सादर केली.
कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींच्या दोन डोसमधील अंतर १२ आठवड्यांचे ठेवण्यात आल्याचा निर्णय आधीच घेण्यात आला आहे. या शेड्यूलमध्ये कोणताही बदल नसल्याचेही आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव यांनी स्पष्ट केले.
जुलैच्या मध्यापासून ऑगस्ट २०२१ च्या सुरवातीला देशात लसीचा साठा एवढ्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असेल, की आपण दररोज १ कोटी नागरिकांचे लसीकरण करू शकू, असा विश्वास भार्गव यांनी व्यक्त केला.
1,27,000 cases have been reported in the last 24 hours. Since May 28, the country is reporting less than 2 lakh cases
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ?, मुलांना ‘फ्लू’ची लस देणे महत्वाचे ; तज्ज्ञांचा पालकांना सल्ला
- ५-जी तंत्रज्ञानातून उत्सर्जित होणारी रेडिओ फ्रिक्वेन्सी घातक, अभिनेत्री जुहीचा मोठा विरोध
- मुंबईतील झाडांना आता अमेरिकेतील जागतिक वनस्पतीशास्त्रज्ञ देणार जीवदान!
- सर्वोच्च न्यायालयापासून पंतप्रधान मोदीनींही केलं मुंबई मॉडलचे कौतुक, आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला