विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इस्कॉनचे संस्थापक श्रील भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२६ रुपयांचे नाणे जारी होणार आहे. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभुपादजींच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित व्हर्च्युअल कार्यक्रमातही सहभागी होणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.126 rupee coin to be issued by PM on ISKCON founder Srila Bhaktivedanta Swami Prabhupada’s birthday
स्वामी प्रभुपाद यांनी जगभरात 108 कृष्ण मंदिरे बांधली आहेत. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या 10 वर्षात त्यांनी इस्कॉनची स्थापना केली. संपूर्ण जगात श्री कृष्ण भक्तीची संपूर्ण चळवळ निर्माण केली. न्यूयॉर्कमधील पहिले मंदिर 1966 मध्ये बांधले गेले आणि भारतातील पहिले मंदिर वृंदावनमध्ये 1975 मध्ये बांधले गेले. 14 नोव्हेंबर 1977 रोजी त्यांच्या मृत्यूपर्यंत 108 मंदिरे बांधली गेली होती. सध्या, इस्कॉनची जगभरात एकूण 600 मंदिरे आणि केंद्रे आहेत.
श्रील प्रभुपादाने श्रीकृष्णाच्या भक्तीची चळवळ जगात सुरू केली आणि त्यांचा जन्म श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या एक दिवसानंतर झाला. 1896 मध्ये जन्माष्टमी 31 ऑगस्ट रोजी होती, श्रील प्रभुपादचा जन्म 1 सप्टेंबर रोजी झाला. या वर्षी हा देखील एक योगायोग आहे की, जन्माष्टमी 30 ऑगस्ट रोजी आहे, त्यांचा वाढदिवस 31 आॅगस्ट आणि 1 सप्टेंबरच्या तारखेनुसार साजरा केला जाईल.
वयाच्या 69 व्या वर्षी स्वामी प्रभुपाद जहाजाने अमेरिकेला जात होते. अटलांटिक महासागराच्या लाटांवर वेगाने जाणाऱ्या जहाजावर ते आजारी पडले. 23 ऑगस्ट 1965 रोजी त्यांना जहाजावर दोन दिवसात सलग दोन हृदयविकाराचे झटके आले. ते अमेरिकेत पोहोचकाळे तेव्हा त्यांच्या ओळखीचे कोणीही नव्हते.काही दिवसांनी एका अमेरिकन तरुणाने त्यांच्याकडून दीक्षा घेतली.
अमेरिकेतील बोस्टन येथे एका भाड्याच्या घरात दररोज भगवद्गीतेवर व्याख्याने देणे, नंतर स्वत:च्या हाताने तयार केलेला प्रसाद वाटणे आणि प्रत्येक रविवारी बोस्टनमधील टॉमकिन स्क्वेअरवर हरे कृष्णाचा जप करणे हा त्यांचा महिनाभराचा दिनक्रम होता.हळूहळू लोक त्यात सामील होऊ लागले. त्यानंतर 11 जुलै 1966 रोजी त्यांनी न्यूयॉर्कमध्ये इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्णा कॉन्शियसनेस म्हणजेच इस्कॉनची नोंदणी केली
126 rupee coin to be issued by PM on ISKCON founder Srila Bhaktivedanta Swami Prabhupada’s birthday
महत्त्वाच्या बातम्या
- आईच्या प्रियकराकडून बलात्कार, पीडित तरुणीला उच्च न्यायालयाने दिलीगर्भपाताची परवानगी
- व्हॉट्सॲपने भारतात 3 दशलक्ष खात्यांवर बंदी घातली, ती का? वाचा सविस्तर
- उद्या दिल्ली, मध्य प्रदेश , तलंगणा आणि इतर राज्यांमध्ये शाळा पुन्हा सुरू होत आहेत, वाचा कोण-कोणती आहेत राज्य
- ईडीच्या चौकशीच्या आधीच चार दिवस खासदार भावना गवळींच्या कारखान्याची चौकशी सहकार विभागाकडून रद्द
- शरद पवारांचे रणनितीचे धडे, भाजपला फायदा होईल अशा आघाड्या करू नका