विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : किसान मोर्चाने येत्या २६ तारखेला जाहीर केलेल्या देशव्यापी निषेध दिनाला काँग्रेससह देशातील १२ प्रमुख विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. त्यादिवशी शेतकरी आंदोलनाला सहा महिने तसेच नरेंद्र मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण होत आहेत. 12 opposition parties gave support to kissan morcha
केंद्राच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक या पक्षांनी देशव्यापी निदर्शनांना पाठिंबा दर्शविला आहे.
या बाबत सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, शरद पवार या ज्येष्ठ नेत्यांसह ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, एम. के. स्टॅलीन आणि हेमंत सोरेन या मुख्यमंत्र्यांनी संयुक्त निवेदन जारी केले. केंद्राने हटवादी भूमिका सोडावी आणि शेतकऱ्यांबरोबर तातडीने चर्चा सुरु करून कायदे मागे घ्यावेत, असे त्यात म्हटले आहे.
शेतकऱ्यांचे आंदोलन शांततापूर्ण असून त्यास एकमुखी पाठिंबा असल्याचेही नमूद करण्यात आले. १२ मे रोजी पंतप्रधानांना याबाबत निवेदन देण्यात आले होते, असेही सांगण्यात आले.
12 opposition parties gave support to kissan morcha
महत्त्वाच्या बातम्या
- करचोरी रोखणार, जीएसटी अधिकाऱ्यांना मिळणार मालवाहू वाहनांची अपटूडेट माहिती, इे- वे सिस्टिम आता फास्ट टॅगशी जोडणार
- १२० व्या वर्षीही लसीकरणानंतर फिट, काश्मीरमधील महिला म्हणाली मी लस घेऊ शकते तर सर्व जण का नाही?
- नमाज झाल्यावर पॅलेस्टाईनचे ध्वज फडकाविण्याचे आवाहन, उत्तर प्रदेशातील तरुणाला अटक
- TATA WITH YOU YESTERDAY TODAY and TOMORROW ! मानवता परमो धर्म : ! कर्मचार्यांसाठी मालक म्हणजे खरोखरच ‘रतन’