• Download App
    विरोधकांचा पत्रप्रपंच : पीएम मोदींना 12 नेत्यांचे पत्र; मोफत लसीकरण, मोफत अन्नधान्याची मागणी । 12 Opposition Leaders Wrote Letter to PM Modi; Demand for free vaccinations, free food for poor

    विरोधकांचा पत्रप्रपंच : पीएम मोदींना १२ नेत्यांचे पत्र; मोफत लसीकरण, मोफत अन्नधान्याची मागणी

    Letter to PM Modi : विरोधी पक्षांच्या 12 नेत्यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले. या पत्रात नेत्यांनी पंतप्रधानांशी कोरोनासंदर्भात 9 सूचना केल्या. विरोधी पक्षांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केंद्र सरकारवर केला. कॉंग्रेसकडून सोनिया गांधी, जेडीएसचे एचडी देवेगौडा, राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, तृणमूल कॉंग्रेसचे ममता बॅनर्जी, द्रमुकचे एमके स्टालिन, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूक अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा आणि माकपचे सीताराम येचुरी यांचा समावेश आहे. 12 Opposition Leaders Wrote Letter to PM Modi; Demand for free vaccinations, free food for poor


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या 12 नेत्यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले. या पत्रात नेत्यांनी पंतप्रधानांशी कोरोनासंदर्भात 9 सूचना केल्या. विरोधी पक्षांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केंद्र सरकारवर केला. कॉंग्रेसकडून सोनिया गांधी, जेडीएसचे एचडी देवेगौडा, राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, तृणमूल कॉंग्रेसचे ममता बॅनर्जी, द्रमुकचे एमके स्टालिन, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूक अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा आणि माकपचे सीताराम येचुरी यांचा समावेश आहे.

    काय आहेत विरोधकांच्या मागण्या?

    “प्रिय पंतप्रधान!” कोरोनामुळे, आपला देश अनपेक्षित मानवी शोकांतिकेशी झगडत आहे. केंद्र सरकारने तातडीने काही पावले उचलणे आवश्यक असल्याचे आम्ही यापूर्वीही वैयक्तिक आणि संयुक्तपणे आपल्या लक्षात आणून दिले आहे. दुर्दैवाने, आपल्या सरकारने आमच्या सर्व सूचनांकडे दुर्लक्ष केले किंवा त्या नाकारल्या. यामुळे या भयानक मानवी शोकांतिकेपर्यंतची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. देशाला या भयंकर ठिकाणी आणण्यासाठी केंद्राने काय केले अथवा काय नाही, यावर न जाता आमचा ठाम विश्वास आहे की सरकारने युद्धपातळीवर खाली दिलेली पावले उचलावीत…

    • लसींची केंद्रानेच खरेदी करावी. मग भलेही ती जगातील कोणत्याही माध्यमातून का मिळेना.
    • देशभरात त्वरित मोफत लसीकरण मोहीम सुरू करावी.
    • देशात लस उत्पादन वाढविण्यासाठी आवश्यक परवाना देण्याची पावले उचलली पाहिजेत.
    • अर्थसंकल्पात दिलेले 35 हजार कोटी रुपये लसीवर खर्च करावेत.
    • सेंट्रल व्हिस्टा बांधकाम त्वरित थांबवावे. यासाठी खर्च केलेली रक्कम ऑक्सिजन आणि लस खरेदी करण्यासाठी वापरली पाहिजे.
    • अधिकाधिक लसी, ऑक्सिजन आणि वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी पीएम केअरच्या विनाअनुदानित खासगी ट्रस्ट फंडामध्ये जमा केलेली सर्व रक्कम द्यावी.
    • दरमहा 6 हजार रुपये बेरोजगारांना देण्यात यावेत.
    • केंद्र सरकारच्या गोदामांमध्ये 10 दशलक्ष टनांहून अधिक धान्य सडत आहे. हे धान्य गरजूंना नि:शुल्क वाटप करावे.
    • आपले लाखो अन्नदाता महामारीला बळी पडले आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी कृषी कायदे रद्द केले पाहिजेत, जेणेकरून ते देशातील लोकांना पोसण्यासाठी धान्य पिकवू शकतील.
    • आपल्या कार्यालयातून किंवा आपल्या सरकारकडून अशी पावले उचलण्यात आलेली नाहीत, तरीही आम्ही देशहितासाठी तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा करतो.

    काय विसरले विरोधक?

    • मोदी सरकारने महामारीला आळा घालण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू केलेले आहे.
    • राज्यांना या अभियानात आडकाठी येऊ नये यासाठी त्यांनाही थेट उत्पादकांकडून लस खरेदीची मुभा दिलेली आहे.
    • याचा परिणाम म्हणून अनेक राज्यांनी तर ग्लोबल टेंडर काढून लस व इतर वैद्यकीय साहित्य मागवण्याची तयारी केली.
    • देशात दोनच लस निर्मिती कंपन्या आहेत, त्यांनी लसींचे उत्पादन वाढवावे म्हणून त्यांना केंद्राने अग्रिम रक्कम व इतर ठिकाणीही लस उत्पादनास प्रोत्साहन दिले आहे.
    • केंद्र जी लस खरेदी करत आहे, ती सर्व राज्यांना मोफतच देण्यात येत आहे.
    • पीएम केअर्स फंडमधून देशातील जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची उभारणी सुरू झालेली आहे.
    • पंतप्रधान योजनेद्वारे देशभरातील कोट्यवधी गरिबांना गतवर्षीप्रमाणेच याही वर्षी मोफत अन्नधान्य देण्याची तरतूद यापूर्वीच करण्यात आलेली आहे.

    देशातील विरोधी पक्षातील जवळपास सर्वच नेते निवडणुकांदरम्यान महामारीवरील उपाययोजनांवर गप्प राहिले होते. मोदी सरकारने आधीच केलेल्या बहुतांश उपाययोजना विरोधकांनी आपल्या पत्राद्वारे नव्याने मागितल्या आहेत.

    12 Opposition Leaders Wrote Letter to PM Modi; Demand for free vaccinations, free food for poor

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bansuri Swaraj : बांसुरी स्वराज यांनी गांधी कुटुंबाला एका खास ‘बॅग’द्वारे केले लक्ष्य

    Zeeshan Siddiqui : झीशान सिद्दिकी यांना पुन्हा एकदा आल्या जीवे मारण्याच्या धमक्या!

    काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर गोळीबार; पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियातून अमित शाहांना दिल्या कठोर कारवाईच्या सूचना!!