विशेष प्रतिनिधी
अयोध्या : प्रभू श्रीरामाची नगरी म्हणून ओळखण्यात येणाऱ्या अयोध्येत 3 नोव्हेंबर दीपोत्सव होणार आहे. हा पाचवा दीपोत्सवाचा कार्यक्रम अधिक भव्य आणि अविस्मरणीय करण्यासाठी तयारी सुरू झालेली आहे. यावेळी योगी सरकारने दीपोत्सवादरम्यान अयोध्या शहरात 12 लाख दिव्यांची रोषणाई करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि याची नोंद घेण्यासाठी ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ची एक टीम अयोध्येत येणार आहे. विश्वविक्रम करण्यासाठी किमान पाच मिनिटे मातीचा दिवा लावावा लागतो.
12 lakh lamps will lit! Will be recorded in the Guinness Book of World Records
5 दिवस साजरा केला जाणारा दीपोत्सव 2021च्या कार्यक्रनाची सोमवारपासून सुरूवात झाली आहे. पहिले दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मुख्य कार्यक्रम 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यासाठी उत्तर प्रदेशातील सर्व 75 जिल्ह्यांच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना राज्यातील 90 हजारांहून अधिक गावांतील प्रत्येकी पाच मातीचे दिवे अयोध्येत वेळेवर पोहोचतील याची खात्री करण्यास सांगण्यात आले आहे.
HAPPY DIWALI : दिवाळी विशेष! आज वसुबारस षोडपचार पूजन ; या प्रकारे करा गोमातेची पूजा आणि प्रार्थना
2017 मध्ये प्रथमच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दीपोत्सवाचे आयोजन केले होते. 51 हजार दिव्यांसह दीपोत्सवाला सुरुवात झाली. सन 2019 मध्ये 4,04,226 मातीचे दिवे, 2020 मध्ये सरयूच्या काठावर 6,06,569 मातीचे दिवे लावले गेले. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत यावेळच्या दीपोत्सवात 12 लाख मातीचे दिवे प्रज्वलित करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. सरयूच्या तीरावर रामायणाची कथाही अजरामर होईल. तसेच ‘लेझर लाइट’मधील भव्य रामायणाचा शो ‘हेरिटेज’ पद्धतीने दाखवण्यात येणार आहे.
12 lakh lamps will lit! Will be recorded in the Guinness Book of World Records
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान