बसमध्ये एकूण ४५ प्रवासी होते
विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : आसाममधील गोलाघाट येथे बुधवारी सकाळी झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत.12 killed 25 injured in bus truck accident in Assams Golaghat
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास गोलाघाट येथील बलिजन भागातील डेरागावजवळ हा अपघात झाला. जिथे ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. गोलाघाट एसपींनी सांगितले की, अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे तर २५ जण जखमी झाले आहेत.
अपघात एवढा भीषण होता की बसच्या पुढील भागाचे तुकडे झाले. एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये अपघातानंतर बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाल्याचे दिसत आहे. हे पाहून बसच्या समोर बसलेले बहुतेक लोक वाचले नसावेत किंवा ते गंभीर जखमी झाले असावेत असा अंदाज बांधता येतो.
ही बस गोलाघाटहून तिनसुकियाच्या दिशेने जात होती. बसमध्ये एकूण ४५ प्रवासी होते. ही बस नुकतीच राष्ट्रीय महामार्ग 37 वर देरगाव येथे आली असता पहाटे पाचच्या सुमारास समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. ट्रकमध्ये कोळसा भरला होता. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने बसमधील प्रवाशांच्या किंकाळ्या सुरू झाल्या आणि आवाज ऐकून आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले.
12 killed 25 injured in bus truck accident in Assams Golaghat
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : हिट अँड रनचा वाद काय? भारतातल्या कायद्याला विरोध का? परदेशात कोणते कायदे? वाचा सविस्तर
- ‘अबकी बार 400 पार, तीसरी बार मोदी सरकार’, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा नवा नारा!
- ‘हिट अँड रन’ कायद्याची सध्या अंमलबजावणी होणार नाही, संप मागे घेण्याचे आवाहन!
- मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व्हेक्षणाचे काम बिनचूक आणि कालबद्धरितीने व्हावे