या वर्षांत आतापर्यंत 61 दहशतवादी मारले गेले आहेत
विशेष प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर : Jammu and Kashmir येथे परदेशी दहशतवादी मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत. या दहशतवाद्यांच्या कारवाया आणि भरती करण्याच्या पद्धतींमध्येही बदल होताना दिसत आहेत. सीमेवर घुसखोरी करण्याऐवजी अंतर्गत भागात दहशतवादी हल्ले करत आहेत.Jammu and Kashmir
सूत्रांचे म्हणणे आहे की, दहशतवाद्यांना स्थानिक पाठिंबा कमी मिळत आहे आणि त्यांच्याविरुद्ध अचूक कारवायाही केल्या जात आहेत. राज्यात 119 दहशतवादी सक्रिय असल्याचे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे. त्यापैकी 79 पीर पंजालमध्ये आहेत. त्यापैकी 18 स्थानिक तर 61 पाकिस्तानी आहेत. पीर पंजालच्या दक्षिणेस 40 सक्रिय दहशतवादी आहेत. त्यापैकी 34 पाकिस्तानी नागरिक आहेत, तर केवळ 6 स्थानिक दहशतवादी आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चालू वर्षात आतापर्यंत 25 दहशतवादी घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये 24 जवानांचे बलिदान झाले असून गेल्या वर्षी 27 जवानांचे बलिदान झाले होते. या वर्षी 61 दहशतवादीही मारले गेले. त्यापैकी 45 अंतर्गत भागात आणि 16 नियंत्रण रेषेवर मारले गेले. यापैकी 21 पाकिस्तानी होते.
उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचिंद्र कुमार यांनी मंगळवारी व्हाइट नाइट कॉर्प्स जम्मूला भेट दिली. त्यांनी येथे लष्करी ऑपरेशनल तयारीचा आढावा घेतला. नॉर्दर्न कमांडच्या प्रमुखांनी सुरक्षा दलांना दहशवाद्यांविरोधात सावधगिरीने कारवाई तीव्र करण्याचे निर्देश दिले.
जीओसी-इन-सी यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे, कारण गेल्या पाच दिवसांपासून दहशतवादी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या काळात किश्तवाडमधील दोन घटनांमध्ये एक जेसीओ शहीद झाला, तर दोन ग्राम संरक्षण रक्षक दहशतवाद्यांनी मारले. दहशतवाद्यांच्या शोधासाठी लष्कर विशेष मोहीम राबवत आहे.
119 terrorists active in Jammu and Kashmir most of them Pakistani
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल- उद्धव ठाकरेंनी मतांसाठी लाचारी पत्करली, आम्ही हार पत्करू, पण लाचारी नाही
- Devendra Fadnavis सुन ले ओवैसी, कुत्ता भी ना पेशाब करेगा औरंगजेब की पहचान पर, अब तिरंगा लहरायेगा पाकिस्तान पर, फडणवीसांचा घणाघात
- Mahavikas Aghadi महाविकास आघाडीला समर्थनाच्या बदल्यात उलेमा बोर्डाच्या 17 मागण्या
- Sharad Pawar : येवल्यातून पवारांचा भुजबळांवर हल्लाबोल; पण पवारांनी नरसिंह रावांपुढं नांगी टाकली, शिवसेना फोडली; भुजबळांकडून पोलखोल!!