• Download App
    स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त दिल्लीत ७५ ठिकाणी उभारले ११५ फूट उंचीचे राष्ट्र ध्वज, गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचा अरविंद केजरीवाल यांचा दावा|115 feet high national flag hoisted at 75 places in Delhi on the occasion of Independence Day,Arvind Kejriwal claims to have been entered in the Guinness Book of World Records

    स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त दिल्लीत ७५ ठिकाणी उभारले ११५ फूट उंचीचे राष्ट्र ध्वज, गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचा अरविंद केजरीवाल यांचा दावा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त दिल्लीमध्ये ७५ ठिकाणी ११५ फूट उंचीचे राष्ट्रध्वज उभारण्यात आले. याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाल्याचा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. दिल्लीत ५०० ठिकाणी असे तिरंगे फडकविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.115 feet high national flag hoisted at 75 places in Delhi on the occasion of Independence Day,Arvind Kejriwal claims to have been entered in the Guinness Book of World Records

    दिल्लीत प्रत्येक २ किलोमीटर अंतरावर े तिरंगा पाहायला मिळेल, ही दिल्लीची विशेष ओळख राहील. लोकांना घरातून निघाल्यानंतर कामावर जाताना किंवा येताना दोन-तीनवेळा राष्ट्रध्वजाचे दर्शन होईल, यातून देशभक्ती वाढण्यास मदत होईल. गेल्या वर्षी दिल्लीत अर्थसंकल्पात यासाठी विशेष तरतूद केली होती, असे केजरीवाल यांनी सांगितले.



    राजीव गांधी स्टेडियम, एम्स, पितमपुरा, आऊटर रिंग रोड, आझादपूर, सिग्नेचर ब्रीज, किदवाईनगर आदी भागांमध्ये तिरंगा फडकविण्यात आले. जगातील असा हा एकमेव उपक्रम असल्याचा दावा मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केला.

    याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही होईल, असा दावाही त्यांनी केला आहे. लोकांमध्ये व प्रामुख्याने युवकांमध्ये स्वातंत्र्याबद्दलची भावना दृढमूल करण्यासाठी दिल्ली सरकारचा हा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.

    115 feet high national flag hoisted at 75 places in Delhi on the occasion of Independence Day,Arvind Kejriwal claims to have been entered in the Guinness Book of World Records

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे