• Download App
    देशात कोरोना लसींचा तुटवडा असताना राजस्थानमध्ये तब्बल ११.५ लाख डोस वाया, गजेंद्र सिंह शेखावत यांचा आरोप|11.5 lakh doses wasted in Rajasthan due to shortage of corona vaccines in the country, alleges Gajendra Singh Shekhawat

    देशात कोरोना लसींचा तुटवडा असताना राजस्थानमध्ये तब्बल ११.५ लाख डोस वाया, गजेंद्र सिंह शेखावत यांचा आरोप

    देशात सर्वत्र कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा असताना राजस्थानमध्ये तब्बल ११.५ लसीचे डोस वाया घालविण्यात आल्याचाआरोप केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी केला आहे. शेखावत म्हणाले,राज्य सरकारने अठरापेक्षा जास्त वयाच्या प्रौढांसाठी लसीकरणाची परवानगी मागितली होती. त्यासाठी ग्लोबल टेंडरचे नाटकही केले. मात्र, त्यात अयशस्वी झाल्यावर केंद्र सरकारला दोष देणे सुरू केले आहे.11.5 lakh doses wasted in Rajasthan due to shortage of corona vaccines in the country, alleges Gajendra Singh Shekhawat


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशात सर्वत्र कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा असताना राजस्थानमध्ये तब्बल ११.५ लसीचे डोस वाया घालविण्यात आल्याचाआरोप केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी केला आहे.

    शेखावत म्हणाले,राज्य सरकारने अठरापेक्षा जास्त वयाच्या प्रौढांसाठी लसीकरणाची परवानगी मागितली होती. त्यासाठी ग्लोबल टेंडरचे नाटकही केले. मात्र, त्यात अयशस्वी झाल्यावर केंद्र सरकारला दोष देणे सुरू केले आहे.



    एका वृत्तपत्रात राजस्थानातील अनेक शहरांत कोरोना लसींच्या बाटल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याचे उघडकीस आणले होते. त्याचा संदर्भ देऊन शेखावत म्हणाले, राजस्थानने केरळचा आदर्श घ्यायला हवा. कारण केरळमध्ये लसीकरणाचे काम उत्कृष्ठपणे झाले. अत्यंत कमी लसी वाया गेल्या.

    राज्यातील अशोक गेहलोत सरकारवर हल्लाबोल करताना शेखावत म्हणाले, राज्य सरकारने अठरापेक्षा जास्त वयाच्या प्रौढांसाठी लसीकरणाची परवानगी मागितली होती.

    त्यासाठी ग्लोबल टेंडरचे नाटकही केले. मात्र, त्यात अयशस्वी झाल्यावर केंद्र सरकारला दोष देणे सुरू केले आहे.राजस्थान सरकारने लस वाया घालविल्याचा आरापे फेटाळला आहे.

    राज्य सरकारतर्फे म्हटले आहे की राजस्थानमध्ये केवळ दोन टक्के कोरोना लसी वाया गेल्या. राष्ट्रीय पातळीवर कोराना लसी वाया जाण्याची सरासरी सहा टक्के आहे.

    दरम्यान, आरोग्य सचिव अखिल अरोडा यांनी लसी वाया गेल्याचा इन्कार केला आहे. मात्र, त्याचबरोबर संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या वृत्तामध्ये ज्या ठिकाणांचा उल्लेख आहे तेथेही तपासणी करण्याचे आदेश दिले आहे.

    11.5 lakh doses wasted in Rajasthan due to shortage of corona vaccines in the country, alleges Gajendra Singh Shekhawat

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!