वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दहावी-बारावी मंडळाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षभरात दोन वेळा परीक्षा देणे यापुढे अनिवार्य नसेल. सरकार या दिशेने काम करत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा तणाव कमी करता येऊ शकेल, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.10th- 12th examination twice in a year optional; Union Education Minister Dharmendra Pradhan’s efforts to reduce students’ stress
सरकारने ऑगस्टमध्ये नवीन अभ्यासक्रमाचा आराखडा जाहीर केला. त्यानुसार बोर्डाच्या परीक्षा एक वर्षात किमान दोन वेळा होतील, असे नमूद केले होते.
त्याबद्दल प्रधान म्हणाले, ही गोष्ट अनिवार्य नसून ऐच्छिक आहे. बोर्डाच्या परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2009 मध्येही दहावीसाठी विस्तृत मूल्यांकनाची सुरुवात झाली होती. तेव्हा दोन वेळा परीक्षा होती. परंतु 2017 मध्ये जुनी पद्धती लागू झाली.
डमी स्कूलची पद्धत संपवण्याची वेळ : प्रधान
कोटा येथे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांवर प्रधान म्हणाले, डमी शाळांचा प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाही. खासगी कोचिंगची गरजच भासणार नाही या दिशेने सरकार काम करत आहे. पर्यायी शिक्षण व्यवस्थेला संपवण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. कोटा येथे यंदा २३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे.
10th- 12th examination twice in a year optional; Union Education Minister Dharmendra Pradhan’s efforts to reduce students’ stress
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या वादाचे मूळ काय? कसे मजबूत झाले ज्यू? वाचा सविस्तर
- नैनितालमध्ये भीषण अपघात, ३२ प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळी , १४ जण बेपत्ता
- अडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून??; कराडातच नाही, तर बारामतीत कुठून??
- ५०० वर्षांनंतर रामजन्मभूमी परत घेतली, तर ‘सिंध’ का नाही? मुख्यमंत्री योगी यांचे मोठे विधान!