वृत्तसंस्था
नवी दिल्ली : वर्षातून एकदा होणाऱ्या दहावी- बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल होणार आहे. नव्या राष्ट्रीय धोरणाबाबत बुधवारी झालेल्या एका बैठकीनंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सांगितले की, पुढील वर्षीपासून संपूर्ण देशात बोर्डाच्या परीक्षा आता वर्षातून दोन वेळा होतील. या निर्णयामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींना चांगले गुण मिळवण्याची संधी मिळेल.10th, 12th all board exams twice a year; Changes from next year, decided under the new National Education Policy
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मते, नव्या शैक्षणिक धोरणात बोर्ड परीक्षांची नवी संरचना तयार झाली आहे. २०२४ च्या शैक्षणिक सत्रात पुस्तकेही त्यानुसारच तयार केली जातील. दोन वेळा बोर्ड परीक्षा घेण्याचा मुख्य उद्देश मुलांचे विषयांवर लक्ष केंद्रित करणे आहे. याबाबतची शिफारस केंद्राला पाठवली आहे. ते राज्यातील बोर्डांना याबाबत निर्देश देऊ शकतात.
नवा पॅटर्न कशासाठी?… विद्यार्थी अभ्यासाच्या तयारीचे स्वत: मूल्यांकन करू शकतील
नव्या पॅटर्नमुळे विद्यार्थी कमकुवत विषयाची चांगली तयारी करू शकतील. अभ्यासाच्या तयारीचे स्वत: मूल्यांकन करू शकतील. एकच विषय किंवा त्याच्याशी संबंधित तथ्ये विद्यार्थ्यांना वर्षभर लक्षात ठेवण्याची गरज राहणार नाही. अभ्यासाची पुस्तकेही तशीच तयार करण्यात येतील. अनेक महिने कोचिंगची गरज भासणार नाही. अभ्यास लक्षात ठेवण्याएेवजी समज आणि पात्रतेचे मूल्यांकन करण्याची क्षमता वाढेल. विषयांचे सखोल ज्ञान आणि त्याचे व्यावहारिक कौशल्य सक्षम होईल. ज्या विषयात सर्वोत्तम देऊ शकत नाही तोपर्यंत विद्यार्थी परीक्षा देऊ शकतील. त्यांना तयारीच्या अधिक संधी मिळतील.
तामिळनाडू, केरळ व कर्नाटकचा विरोध
तामिळनाडू, केरळ सरकारने यापूर्वीच नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यास नकार दिला आहे. कर्नाटकही याच दिशेने वाटचाल करत आहे. या राज्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, कर्नाटक राज्यासाठी स्वतंत्र शैक्षणिक धोरण तयार केले जाईल. त्यावर काम करण्यासाठी आम्ही समिती स्थापन केली आहे.
कला-विज्ञानाशिवायही नवे विषय निवडता येतील
नवे धोरण लागू झाल्यानंतर मुलांना कला, विज्ञान किंवा वाणिज्याशिवायही नवे विषय निवडण्याची संधी मिळेल. नवे विषय भविष्यातील गरजांनुसार असतील. शिक्षण महामंडळांना मागणीआधारित परीक्षा घेण्याची क्षमता विकसित करावी लागेल.बोर्डांच्या
नव्या अभ्यासक्रमामध्ये तिसरी ते बारावीपर्यंत भर
नव्या शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम तयार केला आहे. केंद्राने तो एनसीईआरटीला दिलाय. सध्या राष्ट्रीय निरीक्षण समिती आणि अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक समिती याचा अभ्यास करत आहे. त्या ३ ते १२ वीच्या अभ्यासक्रमाला अंतिम रूप देतील, असे प्रधान म्हणाले.
अकरावी-बारावीच्या मुलांना शिकाव्या लागतील 2 भाषा
नव्या अभ्यासक्रमामध्ये सांगण्यात आले की, अकरावी आणि बारावीच्या मुलांना दोन भाषांमध्ये शिक्षण घ्यावे लागेल. त्यापैकी एक भाषा भारतीय असेल. हा दृष्टिकोन भाषिक वैविध्यावर भर देईल आणि राष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसादेखील पुढे नेईल.
10th, 12th all board exams twice a year; Changes from next year, decided under the new National Education Policy
महत्वाच्या बातम्या
- चांद्रयान मोहिमेसाठी कैलास खेरचं खास गाणं
- काँग्रेसने स्वतःच्याच सर्व्हेत महाविकास आघाडीला 45 जागा देणे म्हणजे आरशाला मेकअप करून त्याच्यासमोर उभे राहणे!!
- Chandrayaan-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरताच पंतप्रधान मोदींनी सर्वात अगोदर कोणाला फोन केला?
- चंद्रयान 3 प्रत्यक्ष चंद्रावर उतरताना त्यावरील हॉरिझोन्टल वेलोसिटी कॅमेराने टिपलेल्या चंद्राच्या “या” छबी!!