विशेष प्रतिनिधी
कल्याण : दक्षिण आफ्रिकेवरून कल्याण डोंबिवलीमध्ये आलेल्या एक ३३ वर्षीय तरुण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळल्याने त्याच बरोबर नायजेरियातून दोन वर्षांनी डोंबिवलीत आलेल्या एकाच कुटुंबातील चौघांना करोनाची लागण झाल्याने महानगरपालिका सतर्क झाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेले १०९ जण नॉट रिचेबल झाले आहेत. 109 passengers from abroad not reachable in Kalyan Dombivali; Search operation started by the municipality
कल्याण डोंबिवलीत पावसाने झोडपले अनेक भागात पाणीच पाणी
महानगरपालिकेने त्यांच्या संपर्कात असलेले नातेवाईक व इमारतीत राहणाऱ्या लोकांची rt-pcr तपासणी सुरू केली आहे. महानगरपालिका आयुकतांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पालिका शासनाकडून विविध देशातून कल्याण डोंबिवलीमध्ये आलेल्या २९५ नागरिकांची यादी मिळाली.
त्यापैकी ८८ नागरिकांची ऑंटी जैन टेस्टिंग करण्यात आली असून ३४ लोकांचा अहवाल नेगेटिव्ह आले असून ४८ प्रवाशांचे अहवाल येणे बाकी असल्याचे सागत या यादीतील १०९ पैकी काही प्रवाशांचे फोन स्विच ऑफ तर काही प्रवशांच्या घराला कुलूप असल्याने त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त यांनी दिली.
त्याचबरोबर परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी नियमावली तयार केली आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांना १४ दिवस होम कोरोटाईन बंधनकारक केले आहे.
109 passengers from abroad not reachable in Kalyan Dombivali
महत्त्वाच्या बातम्या
- KASHI : १३ डिसेंबरला काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन ; काशी विश्वेश्वर मंदिर-राणी अहिल्यादेवी होळकरांचं योगदान-पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट …
- नाशिक : येवला मुक्तीभूमी ; शासनाकडून मिळाला ‘ब’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा
- RT-PCR : आरटीपीसीआर टेस्टसाठी आता ३५० रुपये आकारणार ; इतर चाचण्यांचे दरही निश्चित..
- Third Wave : ओमायक्रॉनच्या प्रसाराचा वेग सर्वाधिक ; फेब्रुवारीमध्ये येणार तिसरी लाट ;कोरोना नियमांचे पालन करा ..