• Download App
    100 days of Bharat Jodo Yatra complete

    भारत जोडो यात्रेचे 100 दिवस पूर्ण; सावरकर टीआरपीच्या सावटाखाली धुगधुगती लिबरल आशा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे आज 100 दिवस पूर्ण झाले आहेत. सावरकर टीआरपी प्रसिद्धीच्या सावटाखाली असलेली ही यात्रा देशातील लिबरल जमातीसाठी मात्र धुगधुगती आशा देणारी ठरली आहे. कारण सगळीकडे मोदी प्रभाव दिसत असताना लिबरल जमात सैरभैर झाली होती. तिला एक आशेचा दीपस्तंभ हवा होता. भारत जोडो यात्रेतून दीपस्तंभ मिळाला की नाही हा भाग अलहिदा पण धुगधुगती आशा मात्र लिबरल जमातीसाठी निर्माण झाल्याचे दिसते आहे. 100 days of Bharat Jodo Yatra complete

    मशिदी, चर्चेसना भेटी

    राहुलजींची भारत जोडो यात्रा सुरुवातीलाच केरळ आणि तामिळनाडूच्या मशीद आणि चर्चेसना भेटी दिल्याने वादात सापडली. राहुलजींनी त्या यात्रेत अनेक वादग्रस्त धर्मगुरूंची भेट घेतली. त्यामुळे यात्रेच्या मूलभूत हेतूंविषयीच शंका निर्माण झाली. त्यामुळे नंतरच्या टप्प्यात कर्नाटकात राहुलजींनी यात्रेच्या कार्यक्रमात “कोर्स करेक्शन” केले. मध्येच हिंदू मठ मंदिरांना भेटी दिल्या. त्यामुळे त्यांच्या 2019 च्या टेम्पल रनची आठवण झाली. पण तो टेम्पो त्यांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात कायम ठेवला.

    सावरकर मुद्दा काढला, टीआरपी मिळवला

    पण महाराष्ट्रात जेव्हा यात्रेला प्रसिद्धीच मिळेना, तेव्हा निदान प्रसिद्धीचा टीआरपी वाढवण्यासाठी त्यांनी सावरकरांच्या तथाकथित माफीनाम्याचा विषय उकरून काढला आणि भारत जोडो यात्रेचा टीआरपी सुधारला. केरळ आणि कर्नाटकात भारत जोडो यात्रेत मूळ यात्रेपेक्षा सावरकरांची पोस्टर झळकल्याची प्रसिद्धी जास्त झाली. मध्य प्रदेशातल्या एक दोन भाषणात त्यांनी सावरकरांचा मुद्दा आणला. पण त्याला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही.

    रघुराम राजन मुलाखत

    आणि आता जेव्हा यात्रा राजस्थान आज आहे, तेव्हा राहुलजींनी रिझर्व बँकेचे माझी गव्हर्नर रघुराम राजन यांना बरोबर घेतले. त्यांची एक अनौपचारिक मुलाखत घेतली. जणू राहुल गांधी हे राज ठाकरेंच्या रूपात आले. राज ठाकरे हे जसे शरद पवारांचे मुलाखतकार म्हणून समोर आले होते, तसेच राहुल गांधी रघुराम राजन यांच्यासाठी मुलाखतकार रूपात पुढे आले.

    नवे मनमोहन सिंग

    भाजपने त्यावर चुटकी साधली. रघुराम राजन हे स्वतःमध्ये पुढचे डॉ. मनमोहन सिंग बघत आहेत, असे सांगून भाजपचे नेते अमित मालवीय यांनी मनमोहन सिंग यांच्या काळात झालेल्या आर्थिक सुधारणांपेक्षा आर्थिक घोटाळ्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

    लिबरल साठी आशेचा किरण

    दरम्यानच्या काळात मेधा पाटकर, अमोल पालेकर, स्वरा भास्कर यांचाही यात्रेत प्रवास होऊन गेला. एक प्रकारे राहुल गांधींनी या यात्रेत लिबरल जमातीला आशेची धुगधुगी निर्माण करून दिली आहे आणि त्यात हिमाचल प्रदेशातल्या अल्प विजयाने अल्प हर्षोल्ल्हासाची देखील भर पडली आहे. मग गुजरात मध्ये कितीही दारुण पराभव झाला तरी राहुल गांधी तिकडे प्रचाराला गेलेच नव्हते. त्यामुळे तिथल्या दारुण अपयशाचे मापही पदरात पाडून घेण्याचे कारण नव्हते. ते तसे त्यांनी घेतलेही नाही.

    100 days of Bharat Jodo Yatra complete

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट