वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अग्निपथ सैन्यभरती योजनेला उत्तर प्रदेशपासून तेलंगणापर्यंत 13 राज्यांमध्ये विरोध होतो आहे. याचा सर्वाधिक दुष्परिणाम बिहारमध्ये दिसत आहे. सैन्य भरतीची तयारी करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करत आहेत. त्यांना काँग्रेस सारखे राजकीय पक्ष चिथावणी देत आहेत. मात्र, केंद्रीय गृहमंत्रालयाचा अग्निवीरांसाठी आणखी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. 10% quota reserved for firefighters in paramilitary forces
अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात 4 वर्षे पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि आसाम रायफल्समधील भरतीसाठी 10 % रिक्त जागा राखीव ठेवण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली आहे.
– उच्च वयोमर्यादेच्या पुढे 5 वर्षांसाठी वयोमर्यादा शिथिल
अग्निवीरांना उपरोक्त 2 दलांमध्ये भरतीसाठी उच्च वयोमर्यादेपेक्षा 3 वर्षे वयाची सूट दिली जाईल. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीसाठी उच्च वयोमर्यादेच्या पुढे 5 वर्षांसाठी वयोमर्यादा शिथिल असेल, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी नुकत्याच जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेअंतर्गत नव्याने भरती होणाऱ्यांसाठी प्रवेशाची वयोमर्यादा 17 वर्षे 6 महिने ते 21 वर्ष अशी निश्चित करण्यात आली होती. परंतु, गेली 2 वर्षे भारतीय सैन्यात भरती प्रक्रिया सुरू करणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे केंद्र सरकारने 2022 साठी प्रस्तावित सैन्य भरतीसाठी वयामध्ये यंदा सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 2022 अग्नीपथ योजनेतील भरती प्रक्रियेसाठी उच्च वयोमर्यादा 23 वर्षे अशी करण्यात आली आहे.
भरतीचे नोटिफिकेशन लवकरच होणार जाहीर
अग्निवीरांसाठी भरतीचे नोटिफिकेशन लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी शुक्रवारी दिली आहे. 2022 मधील भरतीसाठी वयोमर्यादा 23 वर्ष करण्याचा सरकारचा निर्णय आम्हाला मिळाला आहे. कोरोना महामारीच्या काळातही जे भरती परीक्षेसाठी तयारी करत होते अशा तरूणांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून पुढील 2 दिवसांमध्ये नोटिफिकेशन जारी होणार आहे ते या वेब पोर्टलवर पाहू शकणार आहेत http://joinindianarmy.nic.in त्यानंतर याच वेब पोर्टल वर अग्निवीर सेना भरतीबाबतचा विस्तृत कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. डिसेंबर 2022 पूर्वी अग्निवीरांच्या पहिल्या बॅचचे प्रशिक्षण सुरू होईल.
भारतीय सेनेत सहभागी होण्याची मोठी संधी यामधून प्राप्त झाली आहे, त्याचा फायदा घेण्याचे आवाहन सैन्य प्रमुखांनी केले आहे.