Saturday, 10 May 2025
  • Download App
    छाप्यांमध्ये 351 कोटी सापडल्यानंतर 10 दिवसांनी धीरज सावनी तोंड उघडले; "हात" वर करून मोकळे झाले, पण... 10 days after 351 crores were found in the raids, Dheeraj Sawani opened up

    छाप्यांमध्ये 351 कोटी सापडल्यानंतर 10 दिवसांनी धीरज साहूनी तोंड उघडले; “हात” वर करून मोकळे झाले, पण…

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांनी कंपन्यांवर पडलेल्या छाप्यानंतर तब्बल दहा दिवसानंतर तोंड उघडले आणि “हात” वर करून मोकळे झाले. सापडलेले 351 कोटी रुपये आपलेच नाहीतच ते आपल्या कंपन्यांचे आहेत आणि काँग्रेस पक्षाशी त्याचा काहीही संबंध नाही, असा दावा साहू यांनी केला. 10 days after 351 crores were found in the raids, Dheeraj Sawani opened up

    काँग्रेस खासदार धीरज प्रसाद साहू यांनी त्यांच्या ठिकाणांवर 351 कोटींची रोख रक्कम सापडल्यानंतर अखेर 10 दिवसांनी मौन सोडले. आपलं कुटुंब सगळा व्यवसाय सांभाळत असून, जो पैसा सापडला आहे तो थेट त्यांचा नसून ज्या कंपन्यांवर छापे घालण्यात आले त्यांचा आहे. हा पैसा काँग्रेस किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, असा दावा त्यांनी केला.

    प्राप्तिकर विभागाने 6 डिसेंबरपासून बौध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड आणि धीरज साहू यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या संस्थांविरुद्ध सुरु केलेली कारवाई अखेर शुक्रवारी संपली. ओडिशा आणि झारखंड येथे हे छापे टाकण्यात आले होते. यादरम्यान 353.5 कोटींची रोख रक्कम सापडली होती. भारतातील कोणत्याही तपास संस्थेने केलेली आतापर्यंतची सर्वात मोठी जप्ती आहे.



    धीरज साहू यांच्या कंपन्यांवर छापे घातल्यानंतर अधिकाऱ्यांना पैशांनी कपाटं भरलेली आढळली. घरांमध्ये सगळीकडे पैसाच पैसा असल्याचे व्हिडीओ आणि फोटो समोर आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. भाजपाने यावरुन काँग्रेसला लक्ष्य करत भ्रष्टाचाराचा आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘मनी हाईस्ट’ वेब सीरिजचा उल्लेख करत काँग्रेसला टोला लगावला होता.

    एएनआयशी बोलताना धीरज प्रसाद साहू म्हणाले की, आपण 35 वर्षांपासून राजकारणात असून पहिल्यांदाच आपल्यावर अशा प्रकारचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मी दुखावलो आहे. पण मी जो पैसा सापडला तो माझ्या कंपन्यांचा आहे. आम्ही मागील 100 वर्षांपासून मद्यव्यवसायात आहोत. मी राजकारणात सक्रीय असल्याने व्यवसायात जास्त लक्ष घातले नाही. माझे कुटुंब हा व्यवसाय हाताळते. मी फक्त त्यांच्याकडे व्यवसाय कसा सुरु आहे याची चौकशी करतो, असे धीरज साहू म्हणाले.

    धीरज साहू यांनी आपले 6 भावांचे एकत्र कुटुंब असल्याचे सांगितले. आम्ही सर्व भाऊ या व्यवसायात आहोत. आमची मुलेही कंपन्यांची वेगवेगळी कामे पाहत असतात, अशी माहिती त्यांनी दिली. जो पैसा सापडला आहे, तो मद्य व्यवसायात असणाऱ्या आमच्या कंपन्यांशी संबंधित आहे. आमचा व्यवसाय पारदर्शक आहे. हा पैसा मद्यविक्रीतून आला असून, यामध्ये सर्व व्यवहार रोखीत होत असल्यानेच इतकी रोख रक्कम होती. हा पैसा मद्यविक्रीतून आलेला असून काँग्रेस किंवा इतर राजकीय पक्षाशी त्याचा काही संबंध नाही. हा माझ्या कंपन्यांचा पैसा आहे, असा दावा धीरज साहू यांनी केला.

    काही कंपन्या माझ्या नातेवाईकांशी संबंधित आहेत. मद्य निर्मिती केली जाणाऱ्या बौध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेडच्या आवारात कोणताही पैसा सापडलेला नाही. हा पैसा माझा नाही. हा माझ्या कुटुंबाचा पैसा माझा नसून, माझ्या कुटुंबाचा आणि संबंधित कंपन्यांचा आहे. गरज लागल्यास माझं कुटुंब प्राप्तिकर विभागाला स्पष्टीकरण देईल. आम्ही प्रशासनाला सहकार्य करू, असे धीरज साहू यांनी सांगितले.

    10 days after 351 crores were found in the raids, Dheeraj Sawani opened up

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी