प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात लाल किल्ल्यावरून काल 15 ऑगस्ट रोजी विश्वकर्मा योजनेची घोषणा केली आणि आज बुधवारी मंत्रिमंडळाने विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली. 1 lakh loan to artisans under Vishwakarma Yojana
विश्वकर्मा योजनेद्वारे देशातील कारागिरांना आर्थिक मदत होणार आहे. त्यांना कर्ज आणि प्रशिक्षण, प्रगत तंत्रे आणि कौशल्यांची माहिती यासंबंधी मदतही दिली जाईल. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
- या योजनेअंतर्गत नवीन कौशल्ये, साधने, क्रेडिट सपोर्ट आणि मार्केट सपोर्ट दिला जाईल.
- योजनेअंतर्गत दोन प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. बेसिक आणि अॅडव्हान्स.
- प्रशिक्षणादरम्यान दररोज 500 रुपये मानधनही दिले जाणार आहे.
- आधुनिक साधने खरेदी करण्यासाठी सरकार 15,000 रुपयांची मदत करणार आहे.
- एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. त्याचे कमाल व्याज 5% असेल.
- 1 लाखाच्या मदतीनंतर पुढील टप्प्यात 2 लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होईल.
- नवीन साधने, क्रेडिट समर्थन आणि नवीन बाजार समर्थन प्रदान केले जाईल.
- ब्रँडिंग, ऑनलाइन मार्केट ऍक्सेस यासारखा पाठिंबा दिला जाईल.
- पीएम ई-बस सेवेलाही मान्यता, 10,000 नवीन इलेक्ट्रिक बस धावणार
विश्वकर्मा योजनेशिवाय पीएम ई-बस सेवेलाही मान्यता देण्यात आली आहे. या योजनेवर 57,613 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. याअंतर्गत देशभरात सुमारे 10,000 नवीन इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) मॉडेलवर बसेस चालवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. 57,613 कोटींपैकी 20,000 कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहेत. या योजनेत 300000 आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश असेल.
1 lakh loan to artisans under Vishwakarma Yojana
महत्वाच्या बातम्या
- स्वातंत्र्यदिनी गोव्यातील जनतेला भेट, सरकारी रुग्णालयात मोफत IVF असणारे देशातील पहिले राज्य
- बुर्ज खलिफावर झळकला तिरंगा; ‘हर घर तिरंगा’ आणि ‘जय हिंद’ केले प्रदर्शित; दिल्लीत राष्ट्रपती भवन, संसदही निघाली उजळून
- ब्रिटनमध्ये मोरारी बापूंची रामकथा, PM ऋषी सुनक यांचीही हजेरी; म्हणाले- पंतप्रधान म्हणून नाही, हिंदू म्हणून आलो!
- निष्ठावंत नेत्यांना 75 व्या वर्षी निवृत्त करणारे भाजपचे बॉस पवारांना 83 व्या वर्षी कुठली ऑफर देतील??