• Download App
    Chennai Air Show चेन्नई एअर शोसाठी 15 लाख लोकांची गर्दी;

    Chennai Air Show : चेन्नई एअर शोसाठी 15 लाख लोकांची गर्दी; गुदमरून 5 ठार, 200 हून अधिक रुग्णालयात दाखल

    Chennai Air Show

    वृत्तसंस्था

    चेन्नई : Chennai Air Show हवाई दलाने ९२व्या स्थापना दिनाच्या दोन दिवस आधी रविवारी चेन्नईत एअर शो  ( Chennai Air Show ) घेतला. यात तेजस, राफेल, सुखोई-३० सह ७२ विमानांनी प्रात्यक्षिके दाखवली. एअर शो पाहण्यासाठी १५ लाखांहून अधिक लोक आले होते. जगातील सर्वांत लांब मरीना बीचवर भर उन्हात इतकी गर्दी उसळली होती की एकीकडे पाण्याचा समुद्र, तर दुसरीकडे लोकांचा समुद्र दिसत होता. ११ वाजता सुरू झालेला शो दुपारी एक वाजता संपला. यानंतर जाण्याच्या घाईत श्वास गुदमरल्याने ५ लोकांचा मृत्यू झाला. २०० पेक्षा अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.Chennai Air Show



    शेकडो लोकांवर मरीना बीचवर प्राथमिक उपचार करण्यात आले. शोच्या वेळी दुपारी ३५ अंश तापमान होते. शो संपल्यावर जाण्याच्या घाईत लोक दोन तास अडकले. अनेक लोक उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी आसपासच्या झाडांवर चढले. आणीबाणीसाठी ४० रुग्णवाहिका तैनात केल्या, पण गर्दीमुळे त्यांना बाहेर जाता आले नाही.

    लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

    हा एअर शो १५ लाख लोकांनी बघितला. त्याचबरोबर तो लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाला. २१ वर्षांपूर्वी जेव्हा येथे एअर शो झाला होता तेव्हा १३ लाख लोक जमले होते. तामिळनाडू भाजप अध्यक्ष अण्णामलाई यांनी या घटनेला अपघात म्हणता येणार नसल्याचे म्हटले. सत्ताधारी द्रमुक सरकारचे प्रशासन सुरक्षा व वाहतूक व्यवस्थापनात अपयशी ठरले शोवेळी सुपरसोनिक राफेलसह ७२ लढाऊ विमानांनी आकाशात अनेक रंग पसरवले. रेल्वे स्टेशनवरही प्रवाशांचा महापूर लोटला छायाचित्र वेलाचेरी रेल्वे स्टेशनचे आहे. येथे एअर शो पाहण्यासाठी जाणाऱ्यांची इतकी गर्दी होती की पाय ठेवायलाही जागा नव्हती.

    1.5 lakh crowd for Chennai Air Show; 5 killed by suffocation, more than 200 hospitalized

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य