• Download App
    ई-श्रम पोर्टलवर तब्बल दीड कोटीहून जास्त कामगारांची नोंदणी|1.5 Cr workers registered name on Shrm portel

    ई-श्रम पोर्टलवर तब्बल दीड कोटीहून जास्त कामगारांची नोंदणी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – केंद्राकडून सुरू करण्यात आलेल्या ई-श्रम पोर्टलवर आतापर्यंत १.६६ कोटी कामगारांनी आपली नोंदणी केली आहे. ई-श्रम पोर्टल हे असंघटित कामगारांसाठी तयार करण्यात आलेले आहे. श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी मुंबईत असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई-श्रम कार्ड वितरित केले आहे.1.5 Cr workers registered name on Shrm portel

    त्यांनी यावेळी व्यक्तिशः १० कामगारांना कार्डचे वितरण केले, जे आता देशात कुठेही सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात. यासह या १० कामगारांना अटल विमा व्यक्ती कल्याण दिलासा योजनेंतर्गत स्वीकृती पत्र वितरित करण्यात आले आहे. असंघटित कामगारांची माहिती तयार करण्यासाठी २६ ऑगस्ट रोजी ई- श्रम पोर्टल सुरू करण्यात आले होते.



    ई-श्रम पोर्टल देशातील ३८ कोटींहून अधिक असंघटित कामगारांची निशुल्क नोंदणी करेल आणि त्यातून सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये याची मदत होईल. सरकारने पोर्टलवर नोंदणीसाठी इच्छुक कामगारांच्या मदतीसाठी राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक १४४३४ सुरू केला आहे.

    हे पोर्टल कामगार, स्थलांतर करणारे कामगार, घरगुती काम करणारे कामगार, कृषी क्षेत्रातील कामगार, दुधवाले, मच्छीमार, ट्रक चालकांसह सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांची मदत करेल.

    1.5 Cr workers registered name on Shrm portel.

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाल पोलिसांना म्हटले ‘मूक प्रेक्षक’