विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रगीत गायल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्याचे आवाहन केले होते. केंद्राच्या आवाहनाला जगभरातून दीड कोटी भारतीयांनी प्रतिसाद दिला. एकाच दिवशी एकाच विषयावरील एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हिडीओ अपलोड केल्याने विक्रम रचण्यात आला.1.5 cr Indians upload vdo of national anthem recording
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील जनतेने ‘आझादी का अमृतमहोत्सव’ या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. जगभरातील दीड कोटींहून अधिक भारतीयांनी राष्ट्रगीत गातानाचे व्हिडीओ अपलोड करत विक्रम नोंदवला आहे.
हे अभियान भारतीयांमधील एकता, क्षमता आणि सौर्हादाचे प्रतीक ठरले आहे. या अभियानात प्रख्यात कलाकार, राजकीय नेते, वरिष्ठ अधिकारी, सैन्यातील जवान, प्रसिद्ध खेळाडू तसेच सर्वसामान्य जनतेने सहभाग नोंदवल्याचे केंद्राने सांगितले.
1.5 cr Indians upload vdo of national anthem recording
महत्त्वाच्या बातम्या
- विजय मल्ल्याच्या किंगफिशर हाऊसचा अखेर लिलाव, हैदराबादच्या ‘सॅटर्न रियल्टर्स’कडून ५२.२५ कोटीत खरेदी
- गोवा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी विरोधासाठी आगीत ओतले तेल, मात्र स्थानिकांनी नौदलासोबत उत्साहाने केले झेंडावंदन
- दिल्लीच्या सर्व सरकारी शाळांमध्ये आता देशभक्तीपर अभ्यासक्रम, मुख्यमंत्री केजरीवाल
- महाराष्ट्रात डेल्या प्लस व्हेरिएंटच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ, लहान मुलांनाही लागण