राज्यात कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे यंदाच्या वर्षी नियमित शासकीय बदल्यांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, आपत्कालीन परिस्थितीतील बदल्या होऊ शकणार आहेत. Ban on transfers of state government employees
प्रतिनिधी
मुंबई : राज्यात कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे यंदाच्या वर्षी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियमित शासकीय बदल्यांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, आपत्कालीन परिस्थितीतील बदल्या होऊ शकणार आहेत.
राज्यात कोरोनाच्या महामारीविरुध्द शासकीय यंत्रणा लढत आहे. महसूलपासून शिक्षण विभाापर्यंतची यंत्रणा त्यासाठी काम करत आहे. कोरोवरील कामांवर परिणाम होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरवर्षी एप्रिल महिन्यापासूनच बदल्यांचा मोसम सुरू होतो. साधारणत: मे आणि जूनमध्ये बदल्या होतात. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शाळांमध्ये प्रवेश घेणे सोपे होते. प्रामुख्याने शिक्षक बदल्यांमध्ये तरअनेकदा वादावादीही होते.
मात्र, यंदाच्या वर्षी ३१ जुलैपर्यंत कोणत्याही बदल्या करू नयेत, असा आदेश राज्य सरकारने काढला आहे. मात्र, सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणारी पदे किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील रिक्त पदे भरण्यासाठी बदल्या करता येऊ शकतात. त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यच्या विरोधात गंभीर स्वरुपाची साधार तक्रार प्राप्त झाल्यास त्याची बदली करणे आवश्यक असल्यास करता येणार आहे.
कोविड -१९ या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावाचा वेळोवेळी आढावा घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही राज्य शासनाच्या आदेशात म्हटले आहे.