लडाखमधील हानले हे ‘नाईट स्काय अ’साठी सर्वोत्तम ठिकाण आहे
विशेष प्रतिनिधी
लडाख : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोमवारी सांगितले की, लडाखमध्ये उभारले जाणारे भारतातील पहिले नाईट स्काय अभयारण्य केंद्रशासित प्रदेशातील खगोल पर्यटनाला चालना देईल आणि महसूल तसेच रोजगार निर्माण करेल. “विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग व CSIR च्या वतीने आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लवकरात लवकर नाईट स्काय रिझर्व्हचे उद्घाटन करण्याची विनंती करू,” असे त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले आहे. Do you know about India’s first Night Sky Sanctuary
लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल (LAHDC) चे अध्यक्ष ताशी ग्याल्सन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नवी दिल्लीत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे केंद्रीय जितेंद्र सिंह यांची भेट घेतली. या भेटीत प्रदेशाच्या विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, लडाख केंद्रशासित प्रशासनाने पूर्व लडाखमधील हानले गावात प्रस्तावित डार्क स्काय रिझर्व्हला अधिसूचित केले होते.
नाईट स्काय अभयारण्य म्हणजे काय?
नाईट स्काय सॅंच्युअरी म्हणजे जेथे प्रकाश प्रदूषण नियंत्रित केले जाते. रात्रीच्या वेळी जास्तीत जास्त अंधाराची खात्री केली जाते, जेणेकरून आकाशातील ग्रह आणि तारे यांचा अभ्यास करता येईल. लडाखमधील हानले हे नाईट स्काय अभयारण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे जास्त लोकांची गर्दी नसते तसेच संपूर्ण आकाश निरभ्र आणि कोरडे हवामान असते.
नाईट स्काय रिझर्व्ह परिसर १ हजार ७३ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला आहे. जे चांगथांग वन्यजीव अभयारण्यात स्थित आहे आणि भारतीय खगोलशास्त्रीय वेधशाळेला लागून आहे. याशिवाय ४ हजार ५०० मीटर उंचीवर हेनली येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्सची जगातील दुसऱ्या क्रमांकाची ऑप्टिकल टेलिस्कोपही आहे.
“हे डार्क स्काय रिझर्व्ह जगातील केवळ अशा १५ किंवा १६ पैकी एक आहे जे रात्रीच्या आकाशाचे विहंगम दृश्य देऊ शकेल. त्याची उंची आणि स्थान यामुळे हे नाईट स्काय रिझर्व्ह जवळजवळ वर्षभर स्टार गॅझर्ससाठी एक आदर्श ठिकाण आहे.” असं जितेंद्र सिंह म्हणाले आहेत.
Do you know about India’s first Night Sky Sanctuary
महत्वाच्या बातम्या
- Umesh Pal Murder Case : ५ लाखांचा इनाम असलेला शूटर गुलाम मोहम्मदच्या घरावर बुलडोझर
- रामसेतू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होणार
- मुंबई – गोवा महामार्गाची प्रतीक्षा डिसेंबर 2023 अखेरपर्यंत संपणार; काम पूर्ण होणार!!
- लंडनमध्ये तिरंग्याचा अपमान झाल्याबद्दल दिल्लीत शिखांचा संताप; ब्रिटीश उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने