• Download App
    परिस्थीती पाहून लॉकडाउन जाहीर करण्याचे सर्व राज्यांना मुक्त स्वातंत्र्य, गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी|States can decide regarding lockdown

    परिस्थीती पाहून लॉकडाउन जाहीर करण्याचे सर्व राज्यांना मुक्त स्वातंत्र्य, गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी

    विशेष प्रतिनिधी

    हैदराबाद  :कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी देशातील सर्व राज्ये लॉकडाउन लागू करणे आणि कंटेन्मेंट झोन्स तयार करण्याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी म्हटले आहे.States can decide regarding lockdown

    त्या त्या राज्यांनी तेथील परिस्थीतीनुसार निर्णय घेण्यास सुरवातदेखील केली आहे. अनेक राज्यांनी लॉकडाउन जाहीर केले आहे तर काही र्जायंनी त्यात वाढ केली आहे.



    सर्व राज्य सरकारांना कंटेन्मेंट झोन तयार करण्याची मुभा असून त्यांनी परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा, असे रेड्डी यांनी नमूद केले.ते म्हणाले, की केंद्राकडून देण्यात येणारा ऑक्सिजनचा कोटा वितरित करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर राहणार आहे.

    परदेशातून हवाई दलाच्या मदतीने ऑक्सिजन आणले जात असून लोकसंख्येच्या आधारावर राज्यांना त्याचे वितरण केले जात आहे. कोरोनाला रोखणे हे लोकांच्या हातात आहे.

    आपण केवळ लोकांवर उपचार करू शकतो, परंतु कोरोनाला रोखू शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारी वागावे, असे आवाहन त्यांनी केले.

    States can decide regarding lockdown

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची