मागील सहा महिन्यांत योजनेअंतर्गत उघडलेल्या 14.84 लाख खात्यांमध्ये 8,630 कोटी झाले जमा
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि बचत करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी 2023-2024 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात “महिला सन्मान बचत पत्र” योजना सुरू करण्यात आली. या योजनेचे देशातील स्त्रीशक्तीने भरभरून कौतुक केले आहे. गेल्या सहा महिन्यांत या योजनेअंतर्गत उघडलेल्या 14.84 लाख खात्यांमध्ये 8,630 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. Mhila Samman Bachat Patra scheme is truly empowering the women of the country financially
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणार्या लहान बचत योजनांप्रमाणेच एक बचत योजना आहे. केंद्र शासनाने दोन वर्षे या अल्प मुदतीसाठी, “महिला सम्मान बचत पत्र” ही बचत योजना जाहीर केली आहे. ज्याची घोषणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. ही योजना अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करणाऱ्या महिलांसाठी अत्यंत लाभदायक ठरली आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना देशभरातील बँका आणि पोस्ट ऑफिसमधून उपलब्ध असेल. त्यांच्यामार्फत महिला गुंतवणूक करू शकतात.
योजनेची वैशिष्ट्ये काय? –
1.या योजनेद्वारे दोन वर्षांसाठी जमा केलेल्या रकमेवर 7.5 टक्के दराने व्याज दिले जाईल. यामुळे महिला त्यांच्या ठेवींची बचत करून भविष्यात स्वावलंबी होऊ शकतील.
2.देशातील सर्व महिला महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
3.योजनेत अर्ज करण्यासाठी 10 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलीसाठीही खाते उघडले जाऊ शकते.
4.या योजनेत एका खात्यात एकदाच पैसे भरता येणार असल्याने, दुसरे खाते, तीन महिन्याच्या अंतराने उघडता येतात.
5.एका खातेदारास सर्व खाते मिळून कमाल दोन लाख रुपये गुंतवता येतील.
6.एक वर्ष झाल्यानंतर, खात्यातून ४० टक्के रक्कम एकदा काढता येईल.
7.अपवादात्मक परिस्थितीत मुदत पूर्व खाते बंद करण्याची सोय.
8.योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना योजनेत गुंतवणूक करून करात सूट मिळू शकते.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे –
- अर्जदाराचे आधार कार्ड
- ओळख पुरावा
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- ई – मेल आयडी
- फोन नंबर
Mhila Samman Bachat Patra scheme is truly empowering the women of the country financially
महत्वाच्या बातम्या
- पाकिस्तानात राजकीय पक्षाच्या अधिवेशनात आत्मघाती स्फोट; 44 हून अधिक लोक मरण पावले, 100 जखमी
- ‘’…म्हणूनच उद्धव ठाकरेंना नाट्यगृहात एकपात्री प्रयोग करावा लागला’’ बावनकुळेंनी लगावला टोला!
- IIT मुंबईच्या वसतिगृहाच्या कँटीनमधील पोस्टरवरून वाद; लिहिले- इथे फक्त शाकाहारी लोकांना बसण्याची परवानगी
- संसदेत आज ‘I-N-D-I-A’ची परीक्षा, दिल्ली सेवा विधेयक संमत होण्यापासून विरोधक रोखू शकतील