• Download App
    तेलंगण मुख्यमंत्र्यांच्या कन्येची ईडीकडून 9 तास चौकशी : दिल्ली मद्य धोरण प्रकरणी कविता यांना 16 मार्चला पुन्हा बोलावले|Telangana CM's daughter questioned by ED for 9 hours Kavita summoned again on March 16 in Delhi liquor policy case

    तेलंगण मुख्यमंत्र्यांच्या कन्येची ईडीकडून 9 तास चौकशी : दिल्ली मद्य धोरण प्रकरणी कविता यांना 16 मार्चला पुन्हा बोलावले

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्या कविता यांची काल दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशी झाली. दिल्लीतील मद्य धोरणाबाबत शनिवारी त्यांची 9 तास चौकशी करण्यात आली. चौकशी संपल्यानंतर कविता हैदराबादला रवाना झाल्या. एजन्सीने त्यांना 16 मार्च रोजी पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे.Telangana CM’s daughter questioned by ED for 9 hours Kavita summoned again on March 16 in Delhi liquor policy case

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, कविता यांची हैदराबादचे बिझनेसमन अरुण रामचंद्रन पिल्लई यांच्या वक्तव्याबाबत चौकशी करण्यात आली होती. याप्रकरणी पिल्लईला अटक करण्यात आली आहे. पिल्लई ‘साऊथ ग्रुप’चे फ्रंटमन म्हणून ओळखले जातात. ते कविता यांचे निकटवर्तीय आहेत. मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत (पीएमएलए) कविता यांचे जबाब नोंदवण्यात आले.

    कविता ईडी कार्यालयात पोहोचण्यापूर्वी, केसीआर म्हणाले की, ईडी माझ्या मुलीला अटक करेल अशी भीती मला वाटत होती, म्हणून त्यांनी आपला मुलगा केटीआर आणि तेलंगणा सरकारमधील मंत्री टी. हरीश राव यांनाही दिल्लीला पाठवले होते.



    दुसरीकडे केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप कविता यांनी केला. त्या म्हणाल्या की, जिथे निवडणुका होतात तिथे मोदींच्या आधी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) पोहोचते.

    लढा दिल्लीपर्यंत नेणार : केसीआर

    शुक्रवारी संध्याकाळी पक्षाच्या बैठकीत केसीआर म्हणाले की, चौकशीनंतर ईडी कविताला अटक करू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केसीआर यांना वाटत आहे की, भाजप कविता यांना त्यांच्या पक्षाला धमकवण्यासाठी अटक करू शकते. आपण मागे हटणार नसून हा लढा दिल्लीपर्यंत नेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    कविता यांचे निकटवर्तीय ईडीच्या ताब्यात

    दिल्ली मद्य धोरण प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंगच्या तक्रारींची ईडी चौकशी करत आहे. मंगळवारी दिल्ली न्यायालयाने हैदराबादचे व्यापारी अरुण रामचंद्रन पिल्लई यांना 13 मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. अरुण हे कविता यांच्या जवळचे मानले जातात. पिल्लई यांनी दारू धोरणात बदल करण्यासाठी आम आदमी पक्षाला 100 कोटी रुपये पाठवल्याचा आरोप आहे.

    ईडीचा आरोप आहे की कविता ‘साऊथ कार्टेल’चा भाग आहेत, या ग्रुपने दिल्लीच्या मद्य धोरणात बदल करण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी लाच दिली. साऊथ कार्टेलमध्ये कथितपणे के. कविता, मगनुन्था श्रीनिवासलू रेड्डी आणि आंध्र प्रदेशातील वायएसआरसीपी पक्षाचे खासदार यांचा समावेश आहे. लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी दिल्लीच्या दारू धोरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर ही पॉलिसी मागे घेण्यात आली.

    Telangana CM’s daughter questioned by ED for 9 hours Kavita summoned again on March 16 in Delhi liquor policy case

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य