इंधन दरवाढीचा निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली.Yuvasena protests central government’s fuel price hike in Pune; Bicycle rally with saffron flags
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्याच्या सारसबाग येथे रविवारी सकाळ पासून भगवे झेंडे लावलेल्या सायकली घेऊन भगवे उपरणे घातलेले युवा सेनेचे शेकडो शिवसैनिक जमा झाले होते. इंधन दरवाढीचा निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली.
केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढी विरोधात ही युवा सायकल रॅली काढण्यात आली. पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ तातडीने कमी करण्यात यावी, अशी मागाणी यावेळी करण्यात आली.यावेळी युवासेना पुणे शहर पदाधिकारी दशरथ खिरीड, राम थरकुडे, चेतन चव्हाण, निरंजन दाभेकर, सनी गवते, श्रावण झगडे, विकास बधे, मयूर पवार आदी उपस्थित होते.
या मार्गाने रॅली काढली
सारसबागेकडून सिलाई चौक, शनिपार, अप्पा बळवंत चौक येथून उजवीकडे वळून फरासखाना, दगडूशेठ मंदिर, समाधान चौक, पुन्हा उजवीकडे वळून लक्ष्मीरोड येथून खंडूजी बाबा चौक या मार्गाने सायकल रॅली काढण्यात आली.
युवा सेनेचे विद्यापीठ कक्ष अध्यक्ष कुणाल धनवडे म्हणाले की , इंधन दरवाढीमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ही झळ नागरिकांना सोसावी लागत आहे. यामुळे केंद्र सरकारने ही दरवाढ रोखण्यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे.
Yuvasena protests central government’s fuel price hike in Pune; Bicycle rally with saffron flags
महत्त्वाच्या बातम्या
- कोल्हापूर मधील आर.सी. गँगला पोलिसांनी लावला मोक्का
- केंद्रीय मंत्री खरा झारीतला शुक्राचार्य ; विनायक राऊतांनी नावं न घेता नारायण राणेंवर केला आरोप
- टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा आणि टोकियो पॅरालिम्पिक चॅम्पियन सुमित अँटील यांना आनंद महिंद्रा यांनी महिंद्रा XUV700 गाडी दिली भेट
- भारतीय संस्थानांच्या विलिनीकरणाची श्रेय नेमके कोणाचे? सरदार वल्लभभाई यांचे की नेहरूंचे?; भूपेश बघेल यांच्या भाषणातून नव्या वादाला फोडणी