• Download App
    स्थानिक संदलच्या मिरवणुकीतील युवकांचा त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न; पोलिसात तक्रार दाखल Youths in the local sandal procession attempt to enter the Trimbakeshwar temple

    स्थानिक संदलच्या मिरवणुकीतील युवकांचा त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न; पोलिसात तक्रार दाखल

    प्रतिनिधी

    नाशिक : स्थानिक संदलच्या मिरवणुकीतील काही युवकांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात त्रंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि ब्राह्मण महासंघ, किर्तन कुल यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. Youths in the local sandal procession attempt to enter the Trimbakeshwar temple

    त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टच्या घटनेनुसार हिंदू धर्मीय सोडून अन्य धर्मियांना मंदिरात प्रवेश नाही. दर्शन अधिकार नाहीत. तरी देखील स्थानिक संदलच्या मिरवणुकीतील इतर धर्मीय लोकांनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर महाद्वारातून आत मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तेथे सुरक्षारक्षकांनी त्यांना अडविले. मात्र या युवकांनी सुरक्षारक्षकांची हुज्जत घालून मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला.

    13 मे रोजी रात्री 9:45 च्या सुमारास झालेला हा घुसखोरीचा प्रकार म्हणजे सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न आहे. सबब या संदर्भात योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी विनंती त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट समितीने पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रार अर्जात केली आहे. त्र्यंबकेश्वर मधील अखिल भारतीय कीर्तन कुल संस्थेने देखील याच आशयाचा अर्ज पोलीस स्टेशन मध्ये केला आहे.

    Youths in the local sandal procession attempt to enter the Trimbakeshwar temple

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस