विशेष प्रतिनिधी
पुणे : चारित्र्य पडताळणीसाठी चकरा मारून वैतागलेल्या एका तरुणाने थेट पुणे पोलीस आयुक्तालयासमोरच स्वतःला पेटवून घेतले. पेटवून घेतल्यानंतर हा तरुण थेट आयुक्तालयाच्या आत पळत गेला. गेटवरील पोलिसांनी त्याचा बचाव करीत तात्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.Youth setting himself on fire in front of Pune Police Commissionerate
सुरेश विठ्ठल पिंगळे (रा. खडकी) असे त्याचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्याने पोलिसांकडे चारित्र्य पडताळणीकरिता अर्ज केला होता. त्याकरिता तो आयुक्तालयात चकरा मारीत होता. त्यामुळेच त्याने अंगावर रॉकेल ओतून घेत स्वतःला पेटवून घेतले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या घटनेमुळे आयुक्तलयात खळबळ उडाली आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ससून रुग्णालयात धाव घेतली. या घटनेमागील नेमके कारण काय आहे याबाबत पोलीस माहिती घेत आहेत.
Youth setting himself on fire in front of Pune Police Commissionerate
महत्वाच्या बातम्या
- WATCH : अफगाणी विद्यार्थ्यांच्या समस्येबाबत केंद्राशी चर्चा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची ग्वाही
- WATCH : बये दार उघड आता दार उघड पुजारी व व्यापाऱ्यांचे तुळजाभवानीला साकडे
- AUTOGRAPH PLEASE : ऑलिम्पीक मध्ये खेळाडूंनी मेडल जिंकले तर पंतप्रधानांनी जिंकले त्यांचे मन ; पाहा हा मोदींचा खास गमछा …PROUD PRIME MINISTER …
- SUNANDA PUSHKAR DEATH : शशी थरूर यांची तिसऱी पत्नी सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात निर्दोष मुक्तता ; कोर्टाचा मोठा निर्णय