• Download App
    तुमच्या मुलाला म्याऊं म्याऊं म्हटले तर आवडत नाही, तुम्ही इतरांच्या वजनावर बोलता??; मुख्यमंत्र्यांवर शरसंधानYou talk about the weight of others ??; Sharasandhan on the Chief Minister

    Nitesh Rane : तुमच्या मुलाला म्याऊं म्याऊं म्हटले तर आवडत नाही, तुम्ही इतरांच्या वजनावर बोलता??; मुख्यमंत्र्यांवर शरसंधान

    प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेनेच्या संपर्क मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वजनावर केलेली टीका भाजपच्या नेत्यांना चांगलीच झोंबली आहे. भाजपच्या नेत्यांनी देखील मुख्यमंत्र्यांना तितक्याच तिखट शब्दात उत्तर दिले आहे. You talk about the weight of others ??; Sharasandhan on the Chief Minister

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून फटकारले होते. त्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला होता. या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप आमदार नितेश राणे म्हणाले, तुमच्या मुलाला म्याऊं म्याऊं म्हटले तर राग येतो, मग दुसऱ्यांच्या वजनांबद्दल आणि आवाजाबद्दल तुम्हाला बोलण्याचा काय अधिकार…??

    उद्धव ठाकरेंना हिंदुत्त्वावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांची सभा पाहिल्यानंतर जे औषधे सध्या ते घेत आहेत. त्यांचा परिणाम त्यांच्यावर होत असल्याचे जाणवले. त्यांच्या डॉक्टरांना माझी विनंती आहे त्यांनी आपल्या पेशेंन्टकडे जरा लक्ष द्यावे. अवेळी बोलणे, विषय सोडून बोलणे, आजूबाजूला न पाहता बडबडत राहणे, असा आजार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना झाला असून त्यांची मला चिंता आहे, अशी खोचक शब्दात त्यांनी केली आहे.



    – सहन करण्याची ताकद ठेवा

    उद्धव ठाकरे यांनी वजनावरून फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी म्हटले, तुम्ही दुसऱ्यांच्या वजनावर बोलता. उद्धवजी तिथे उभे असता तर हवेने उडून गेले असता आणि दुसरीकडे कुठे जाऊन पडला असता, असे आम्ही म्हटले तर चालेल का? जर तुम्हाला तुमच्याबद्दल बोललेले आवडत नसेल. तरी तुम्हीही असे बोलणे थांबवा. नाही तर सहन करण्याची ताकद ठेवा, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

    – काय म्हणाले होते मुख्यमंत्री?

    या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बाबरी मशीद पाडताना तेथे होतो, या दाव्याची खिल्ली उडवली. बाबरी पाडली तेव्हा तुम्ही खरेच तिथे गेला असता आणि वर चढायचा प्रयत्न केला असता तर तुमच्या वजनाने बाबरी खाली आली असती, असे शरसंधान उद्धव ठाकरे त्यांनी साधले होते. त्याला नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

    You talk about the weight of others ??; Sharasandhan on the Chief Minister

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!

    Sharad Pawar NCP : पवारांच्या पक्षाची अवस्था चव्हाण + रेड्डी काँग्रेस सारखी; त्यांच्या राष्ट्रवादीच्या गळतीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीची भरती!!