नारायण कुचे हे जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर आमदार झाले. ‘You look at me, I feel like I have become an MLA’, the dance of a suspended BJP MLA; Video viral
विशेष प्रतिनिधी
जालना : जालन्यातील निलंबित आमदार नारायण कुचे यांनी एका लग्न समारंभात भन्नाट डान्स केला आहे. कुचे यांच्या नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.जवा बघतीस तु माझ्याकडं, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय, हे साजन बेंद्रे यांनी लिहिलेलं गाणं चांगलंच प्रसिद्ध आहे.त्यामुळे आमदार नारायण कुचे यांनाही या गाण्यावर ठेका धरण्याचा मोह आवरला नाही.
नारायण कुचे हे जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर आमदार झाले.नारायण कुचे हे मतदारसंघातील अनेकांच्या लग्नाला हजेरी लावत असल्याचं त्यांच्या फेसबुक पोस्टमधून पाहायला मिळतं. विशेष म्हणजे नारायण कुचे यांनी डान्सची कला दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही.
ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपच्या एकूण 12 सदस्यांचं गेल्या अधिवेशनात निलंबन करण्यात आलं होतं.या 12 निलंबित आमदारांमध्ये नारायण कुचे यांचाही समावेश आहे.वर्षभरात विधीमंडळाच्या अधिवेशनात सामिल होण्यास त्यांना मज्जाव करण्यात आला होता.
‘You look at me, I feel like I have become an MLA’, the dance of a suspended BJP MLA; Video viral
महत्त्वाच्या बातम्या
- फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी यांना मरणोपरांत रेडइंक ‘जर्नलिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार जाहीर ; पत्नी फेड्रिक सिद्दीकीने स्वीकारला पुरस्कार
- CM LETTER TO GOVERNOR : मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्रातील सूर धमकीवजा; राज्यपाल कोश्यारी दुखावले
- काश्मीरमध्ये चकमकीत; जैश-ए-मोहम्मदचे सहा दहशतवादी ठार; दोन ठिकाणी कारवाई