विशेष प्रतिनिधी
बुलढाणा : तुम्ही शांत रहा , हे तुमचं राज्य नाही , हे राज्य माझं आहे , इथे सर्व कामे शांततेत झाली पाहिजेत. अशाप्रकारे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ज्येष्ठ नागरिकाला रागाने खडसावले व त्यांना शांत बसवले. You keep quiet, this my kingdom, not yours :Dr. Shingane angry on old man
यावेळी उपस्थित सर्व अधिकारी आणि कार्यकर्तेही शिंगणे साहेबांचा हा राग पाहून शांत बसले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे डॉ. शिंगणे यांच्या मतदार संघातील अधिकारी कर्मचाऱ्यांची आढावा बैठक शनिवारी झाली. बैठक संपल्यावर मतदार संघातील नागरिकांनी शिंगणे साहेबांकडे त्यांच्या प्रलंबित कामांच्या तक्रारी मांडल्या.
एक ज्येष्ठ नागरिक त्यांचे प्रलंबित असलेले काम आणि अर्ज घेऊन शिंगणे साहेबांकडे गेला. त्याची तक्रार मांडण्याची पद्धत पाहून शिंगणे त्या नागरिकांवर चांगलेच भडकले आणि तुम्ही शांत रहा , हे तुमचं राज्य नाही , हे राज्य माझं आहे. इथे सर्व कामे शांततेत झाले पाहिजे. अश्या एकाच वाक्यात नागरिकाला शांत बसविले.त्यानंतर लगेच तहसिलदारांना सांगून त्यांचे काम मार्गी लावण्याच्या सूचनाही केल्या. पालकमंत्री डॉ. शिंगणे यांचा नेहमीचा शांत संयमी स्वभाव सर्वानाच माहित आहे. मात्र,हा त्यांचा स्वभाव पाहून सर्वच अचंबित झाले.
- तुम्ही शांत रहा, हे राज्य माझं आहे : डॉ. शिंगणे
- ज्येष्ठ नागरिकांना खडसावले; व्हिडीओ व्हायरल
- ज्येष्ठ नागरिकाला रागाने खडसावले, सर्व अचंबित
- अधिकारी, कर्मचाऱ्यांची आढावा बैठकीत प्रकार
- ज्येष्ठाच्या तक्रारीची दाखल घेण्याच्या सूचना