पुणे पोलिसांनी आजवर 17 जणांवर कारवाई केली आहे.बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यांच्या शोधात आम्ही आहोत, आणि नागरिकांनी याबाबत माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.You can give information directly to Pune Police about illegal lending; A WhatsApp number issued
विशेष प्रतिनिधी
पुणे : सावकार व्याजावर पैसे देण्याचा बेकायदेशीर व्यवसाय करतात.त्यानंतर अतिरिक्त पैशाची मागणी करुन नागरिकांची फसवणूक व छळ केला जातो.यातून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी पुणे पोलिसांनी एक व्हॉट्सअप नंबर जारी केला आहे.या व्हॉट्सअप द्वारे पुणे पोलिसांना माहिती देता येणार आहे.
९१४५००३१००व्हॉट्सअप नंबरवर माहिती पाठवता येईल.
पुणे पोलिसांनी आजवर १७ जणांवर कारवाई केली आहे.बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यांच्या शोधात आम्ही आहोत, आणि नागरिकांनी याबाबत माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. बरेच सावकार कायद्याला न जुमानता अवाजवी व्याजदर आकारुन सावकारी व्यवसाय करतात.
तुम्हाला हवी तेवढी रक्कम देतो पण तारण म्हणून घराची, जमिनीची अथवा दुकानाची कागदपत्रे ठेवा अशी मागणी करतात.त्यानंतर कर्जाची परतफेड करताना अवाजवी व्याजदर आकारला जातो व एवढे पैसे भरले तर कर्ज फिटेल असे बोलले जाते. यामुळे अनेक अडचणी नागरिकांना निर्माण होतात.दरम्यान नागरिकांना आता अशी बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यांची माहिती देता येणार आहे.
You can give information directly to Pune Police about illegal lending; A WhatsApp number issued
महत्त्वाच्या बातम्या
- बीज बँक प्रत्येक गावागावात साकारा; बीज माता राहीबाई पोपरे यांचे आवाहन
- एसटी स्टॅण्डवर गाणं गाऊन हकायच्या कुटुंबाचा गाडा ; महेश टिळेकर यांनी पैठणी आणि आर्थिक मदत देऊन केला सन्मान
- हिंदू देवदेवतांविषयी केलेल्या विधानाबाबत जितनराम मांझी यांनी मागितली माफी
- तृणमूल कॉँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन निलंबित, सभापतींच्या दिशेने भिकावले नियमांचे पुस्तक
- उध्दव ठाकरे यांचे खास रवींद्र वायकर यांची ईडीकडून आठ तास चौकशी