बारामती येथील कार्यक्रमात वडील राजेंद्र पवार यांना सुनावल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलगा रोहित पवार यांचेही चांगलेच कान उपटले. मास्क घालत नसल्यावरून त्यांनी रोहित पवार यांना खडे बोल सुनावले.You are a MLA, you use a mask, Ajit Pawar slaped Rohit Pawar
विशेष प्रतिनिधी
बारामती : बारामती येथील कार्यक्रमात वडील राजेंद्र पवार यांना सुनावल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलगा रोहित पवार यांचेही चांगलेच कान उपटले. मास्क घालत नसल्यावरून त्यांनी रोहित पवार यांना खडे बोल सुनावले.
पवार म्हणाले, काल कर्जत – जामखेडला गेलो होतो. तिकडे कोणीही मास्क वापरत नाहीत. मी रोहितला म्हटले, अरे शहाण्या तू आमदार आहेस. तू मास्क वापरला तर मला इतरांना सांगता येईल, अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांचे कान धरले. ते म्हणाले, मी भाषण करताना मास्क काढत नाही अन् काही जण मास्कच वापरत नाहीत. हे बरोबर नाही. कोरोना कमी झाला असला तरी दक्षता घेण्याची गरज आहे.
सकाळी लवकर कामाला सुरुवात केली, तर कामे लवकर होतात. काही जण दादा सेल्फी, दादा फोटो म्हणत मागे लागतात. त्यांना नाही म्हणावे तर उपमुख्यमंत्री झाला, साधा सेल्फी काढून देईना. याची बटने दाबून दाबून आम्ही मेलो इतके दिवस. असे म्हटले जाते. म्हणून आपले गप्प बसायचे अन् पहाटे जेवढे काही उरकता येईल तेवढे उरकून घ्यायचा प्रयत्न करायचा.
अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच आली का?
पवार म्हणाले, कुठेही तुटेपर्यंत ताणायचे नसते. तेसुद्धा समाधानी झाले पाहिजेत. प्रवासीसुद्धा समाधानी झाले पाहिजेत. तसेच सरकार म्हणून आम्हालादेखील निर्णय घेता आला पाहिजे. त्रिपुरा येथे झालेल्या जातीय दंगलीचे पडसाद राज्यातील काही शहरांमध्ये उमटले. मात्र, अशा वेळी संयम ठेवून जातीय सलोखा वाढवला पाहिजे. पोलीस दलाला मदत करून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा.
You are a MLA, you use a mask, Ajit Pawar slaped Rohit Pawar
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी