वृत्तसंस्था
मुंबई : अयोध्येमध्ये राममंदिर राम मंदिराला अनुकूल असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर अयोध्या आणि परिसरात जमिनींचे भाव वधारले आणि अयोध्येतील आमदार-खासदार तसेच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या नातेवाइकांनी जमीन खरेदीचा सपाटा लावला. त्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्यानंतर यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कालच दिले आहेत. Yogi orders inquiry into Ayodhya land purchase case; Tikastra for stealing Ayodhya from today’s match !!
राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी राधेश्याम यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीने नेमली आहे. त्यांच्याकडून येत्या पाच दिवसांमध्ये योगी सरकारने या खरेदी व्यवहारात संदर्भात नेमके काय झाले आहे?, याचा तपशीलवार अहवाल मागवला आहे. योगी सरकारने ही सर्व सरकारी कार्यवाही कालच केली आहे.
त्यावर आज सामनाच्या अग्रलेखातून योगी आणि मोदी सरकार यांनी अयोध्येची चोराची आळंदी केल्याची टीका करण्यात आली आहे. जमीन खरेदी कशी झाली? ती कोणी केली, या संदर्भातले तपशील प्रसार माध्यमांनी कालच देऊन झाले आहेत. त्याच मुद्द्यावर आधारित चौकशी करण्याचे आदेशही कालच योगी सरकारने देऊन झाले आहेत. याचा अहवाल येत्या पाच दिवसांमध्ये योगी सरकारला मिळणार आहे. पण तरीदेखील कालच्या इतर प्रसार माध्यमांच्या बातम्यांवर आधारित आज सामनामधून अग्रलेख लिहून योगी सरकारने अयोध्येला चोराची आळंदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अयोध्येमध्ये योगी सरकारने जमिनींचे वाटप खिरापतीसारखे आपल्या आमदार-खासदार आणि सनदी अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना केल्याचा आरोपही यामध्ये करण्यात आला आहे. पुढच्या पाच दिवसांमध्ये या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन त्यासंबंधीचा अहवाल योगी सरकारला मिळणार आहे.
Yogi orders inquiry into Ayodhya land purchase case
महत्त्वाच्या बातम्या
- प्रियांका गांधींच्या मुलांची इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालेली नाहीत; प्राथमिक चौकशीतला निष्कर्ष
- यवतमाळमधील ढोरे कुटुंबात आनंदाचे वातावरण ; पंतप्रधान मोदींकडून नवदाम्पत्याला मिळाले शुभाशीर्वाद
- पिंपरी चिंचवड : तळेगावमध्ये अकरावीत शिकणाऱ्या मुलाची गोळी झाडून हत्या
- नाशिकच्या रावण घोड्याची मोठी चर्चा; सारंगखेडा येथील अश्व यात्रेत कुतूहल