• Download App
    सिगारेटची राख डाेळयात गेल्याने कारागृहात कैद्यात मारहाणीचा प्रकार । Yerwada jail prisoners conflict,case registered in yerwada police station

    सिगारेटची राख डाेळयात गेल्याने कारागृहात कैद्यात मारहाणीचा प्रकार

    येरवडा कारागृहात बंदी असलेल्या एका कैद्याची सिगारेटची राख १५ दिवसांपूर्वी डाेळयात गेल्याचे जुन्या भांडणाचे कारणावरुन दाेन कैद्यांनी एका कैद्याला दगडाने मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. Yerwada jail prisoners conflict,case registered in yerwada police station


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : येरवडा कारागृहात बंदी असलेल्या एका कैद्याची सिगारेटची राख १५ दिवसांपूर्वी डाेळयात गेल्याचे जुन्या भांडणाचे कारणावरुन दाेन कैद्यांनी एका कैद्याला दगडाने मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी राकेश ऊर्फ राख्या जाॅनी यकट व सुरेश बळीराम दयाळु (दाेघे रा.येरवडा कारागृह,पुणे) यांचेवर येरवडा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



    याबाबत पाेलीसांकडे आराेपीं विराेधात अमाेल कालिदास लगस (२२) याने तक्रार दिली आहे. सदर तक्रारदार व दाेन आराेपी हे न्यायबंदी असून त्यांच्या केसची सुनावणी न्यायालयात सध्या सुरु आहे. तक्रारदार अमाेल लगस हा रेकाॅडवरील गुन्हेगार असून २८ एप्रिल राेजी येरवडा मध्यवर्ती कारागृहात सर्कल नं ३ बॅरेक क्रमांक ७ येथे ताे हाेता. त्यावेळी १५ दिवसांपूर्वी अमाेल लगस व राकेश यकट या आराेपीची सिगारेटची राख डाेळयात गेल्याचे जुन्या भांडणाचे कारणावरुन संबंधित आराेपींनी लगस याच्या डाेक्याच्या उजव्या बाजूस दगडाने मारहाण करुन त्यास जखमी केले. या घटनेची माहिती मिळताच, कारागृह पाेलीसांनी संबंधित भांडणे साेडवली आणि यासंर्दभात येरवडा पाेलीस ठाण्यात जखमी कैद्याने दाेन जणां विराेधात तक्रार दाखल केली आहे. येरवडा पाेलीस याबाबत पुढील तपास करत आहे.

    Yerwada jail prisoners conflict,case registered in yerwada police station

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस