illegal conversion : उत्तर भारतात सध्या अवैधरीत्या धर्मांतराचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. गरीब, दिव्यांग, महिला, मुलींना प्रलोभने दाखवून, धमक्या देऊन धर्मांतराची प्रकरणे उघडकीस आली आहेत. आता या प्रकरणाच्या तारा महाराष्ट्रातील यवतमाळशी जोडल्या आहेत. यूपीच्या एटीएसने कानपुरातून अटक केलेल्या यवतमाळच्या तरुणाचे नाव धीरज जगताप असे आहे. Yavatmals Dheeraj Jagtap converted to Islam 10 years ago, since then others have been active in illegal conversion, ATS arrests from Kanpur
प्रतिनिधी
यवतमाळ : उत्तर भारतात सध्या अवैधरीत्या धर्मांतराचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. गरीब, दिव्यांग, महिला, मुलींना प्रलोभने दाखवून, धमक्या देऊन धर्मांतराची प्रकरणे उघडकीस आली आहेत. आता या प्रकरणाच्या तारा महाराष्ट्रातील यवतमाळशी जोडल्या आहेत. यूपीच्या एटीएसने कानपुरातून अटक केलेल्या यवतमाळच्या तरुणाचे नाव धीरज जगताप असे आहे.
मीडिया रिपोर्टसनुसार, उत्तर प्रदेशात अवैध धर्मांतर करणाऱ्यांच्या विरोधात 20 जून 2021 रोजी गुन्हा नोंदवण्यात आला होता. यूपीचे एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आतापर्यंत या केसमध्ये देशभरातून 14 जणांना अटक झाली आहे. मौलाना उमर गौतम, मौलाना कलीम सिद्दिकी यांच्याशिवाय महाराष्ट्रातील रामेश्वर कावडे आणि कैसर आलम या प्रमुख आरोपींना एटीएसने अटक केलेली आहे.
दरम्यान, आता या प्रकरणात धीरज जगतापचे नाव समोर आले आहे. धीरजने दहा वर्षांपूर्वी धर्म बदलून इस्लाम स्वीकारला. तेव्हापासून तो अवैध मार्गाने धर्मांतराचे काम करत होता. तसेच तो धीरज प्रसाद कांवरे, कौसर आलम आणि अरसलान यांच्याशी संपर्कात असल्याचे समोर आले आहे. धीरज आणि इतर आरोपी मिळून हे धर्मांतराचे रॅकेट देशभरात चालवत होते. त्यासाठी त्यांनी DAWAH, REVER आणि REHAB या नावाने व्हॉट्सअप ग्रुप तयार केले होते. याद्वारे ते इतर धर्माबद्दल द्वेष पसरवून आणि प्रलोभने दाखवून लोकांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडत होते, अशी माहिती समोर आली आहे.
Yavatmals Dheeraj Jagtap converted to Islam 10 years ago, since then others have been active in illegal conversion, ATS arrests from Kanpur
महत्त्वाच्या बातम्या
- शाहरुखचा मुलगा आर्यन खानला एनसीबीकडून अटक! “अशी” आणली होती आर्यनने ड्रग्स…!!
- आझादी का अमृत महोत्सव! इंडियन नेव्हीच्या ऑफिसर्स आणि सेलर्सचा नवा उपक्रम, सर केले महाराष्ट्रातील आणि गोव्यातील 75 किल्ले
- सुयशने मोठ्या पगाराची नोकरी सोडली होती, पॅशन आणि प्राण्यांवरील प्रेमाचा आगळावेगळा किस्सा
- सुभाष साबणे : रडत रडत शिवसेना सोडणारा शिवसैनिक-काँग्रेसच्या एकाधिकारशाहीला कंटाळून भाजपमध्ये ! बाळासाहेबांच्या आठवणीने गहिवरला…!
- SSC Recruitment २०२१ : SSC कडून ३२६१ जागांसाठी नोकरीची घोषणा , २५ ऑक्टोबर अर्ज करण्याची अंतिम तारीख , जाणून घ्या कसा करू शकतो अर्ज