• Download App
    आता भाजपकडून उद्धव ठाकरेंविरुद्ध 5 पोलीस ठाण्यात तक्रारी, मुख्यमंत्री योगींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचे प्रकरण । Yavatmal BJP lodging a complaint in 5 police stations Against CM Uddhav Thackeray statement against UP CM Yogi Adityanath

    पलटवार : आता भाजपकडून उद्धव ठाकरेंविरुद्ध 5 पोलीस ठाण्यांत तक्रारी, मुख्यमंत्री योगींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचे प्रकरण

    CM Uddhav Thackeray statement against UP CM Yogi Adityanath : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री ठाकरेबद्दल अपशब्द वापरल्याने काल अटक झाली होती. हा वाद अद्याप मिटलेला नाही. राणेना रात्री उशिरा जामीन मिळाला असला तरी आता या वादाचा दुसरा अंक सुरू होण्याची चिन्हे आहेत. सध्या उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील वक्तव्याची एक क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये उद्धव ठाकरे यांनी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना उद्देशून ‘चपलेने थोबाड फोडावं’ असं वक्तव्य केलेलं आहे. तीन वर्षांपूर्वी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यावरुन भाजप आता उद्धव ठाकरेंविरुद्ध तक्रार दाखल करणार आहे. Yavatmal BJP lodging a complaint in 5 police stations Against CM Uddhav Thackeray statement against UP CM Yogi Adityanath


    विशेष प्रतिनिधी

    यवतमाळ : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री ठाकरेबद्दल अपशब्द वापरल्याने काल अटक झाली होती. हा वाद अद्याप मिटलेला नाही. राणेना रात्री उशिरा जामीन मिळाला असला तरी आता या वादाचा दुसरा अंक सुरू होण्याची चिन्हे आहेत. सध्या उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील वक्तव्याची एक क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये उद्धव ठाकरे यांनी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना उद्देशून ‘चपलेने थोबाड फोडावं’ असं वक्तव्य केलेलं आहे. तीन वर्षांपूर्वी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यावरुन भाजप आता उद्धव ठाकरेंविरुद्ध तक्रार दाखल करणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 5 पोलीस ठाण्यांत भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रारी केल्या जाणार आहेत. त्याबाबतची माहिती भाजपचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी दिली.

    नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता भाजपकडूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार देऊन शिवसेनेला घेरण्याची तयारी करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, यवतमाळसह इतर 5 पोलीस ठाण्यांत तक्रार नोंदवली जाणार आहे.

    काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

    मीडिया रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ 2018 चा आहे. उद्धव ठाकरे हे विधान करताना पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी रॅलीला संबोधित करत होते. त्या वेळी उद्धव ठाकरे योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य करताना म्हणाले होते की, “काल आदित्यनाथ आले होते. योगी! अरे, हा कशाचा योगी, हा तर भोगी आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसतो, हा कसला योगी आहे! उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचं नातं हे या योग्याला सांगायला पाहिजे. शिवरायांचा राज्याभिषेक करायला उत्तर प्रदेशातून गागाभट्ट आले होते. त्यांनी किती सन्मानाने शिवरायांना राज्याभिषेक केला होता. आणि हा जो योगी आला की, गॅसच्या फुग्यासारखा, काही असो नसो हवेत उडत असतो. तसा हा गॅसचा फुगा. आला की सरळ चपला घालून महाराजांना हार घालायला गेला. असं वाटलं त्याच चपला घेऊन त्याचं थोबाड फोडावं. हा अपमान केवळ योगीनी नाही केलेला….”

    Yavatmal BJP lodging a complaint in 5 police stations Against CM Uddhav Thackeray statement against UP CM Yogi Adityanath

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!