विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन आमच्या नियमबाह्य निलंबन प्रकरणाचा सरकारकडून अहवाल मागवून घ्यावा, अशी विनंती केली , असे अभिमन्यू पवार यांनी सांगितले. तसेच लोक्षाहीविरोधी वर्तन करणाऱ्या ठाकरे सरकारविरोधात लेखी तक्रार राज्यपालांकडे केली असल्याचे ते म्हणाले. Written Complaint Against Thackeray Government to Governor: Abhimanyu pawar
तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की अन् शिवीगाळ प्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे न्याय मागण्यासाठी १२ आमदारांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटायला गेले, अशी माहिती पवार यांनी दिली.
ते म्हणाले, निलंबित १२ आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना असे सांगितले की, योग्य ती शहानिशा करून आमच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्याची विनंती केली. लोकशाही विरोधी काम करणाऱ्या ठाकरे सरकारविरोधात लेखी तक्रार दिली आहे.
पवार म्हणाले, ओबीसी समाजाच्या न्यायहक्कासाठी आवाज उठवला म्हणून आघाडी सरकारने खोटे कथन करून आम्हाला निलंबित केलं आहे. मिळालेले अधिकार चुकीच्या पद्धतीनं वापरणाऱ्या सरकारने ‘आपल्या सगळ्यांच्या वरती सर्वोच्च असे जनतेचे न्यायालय आहे’ याचा फक्त विसर पडू देऊ नये.
Written Complaint Against Thackeray Government to Governor: Abhimanyu pawar
महत्त्वाच्या बातम्या
- स्टॅन स्वामींचे निधन, भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी वर्षभरापूर्वी झाली होती अटक
- Mansoon Session 2021 : ओबीसी आरक्षणावरून टीका करणाऱ्या भुजबळांना फडणवीसांनी दाखवला आरसा
- बंडातात्यांची नजरकैदेतून सुटका करा, आषाढी पायी वारीची परवानगी द्या, वारकरी संप्रदायाचे धुळ्यात आंदोलन
- स्वप्नील आत्महत्या प्रकरण : मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्याची भाजयुमोची मागणी
- OBC इम्पिरिकल डेटाचा ठराव म्हणजे वेळकाढूपणा, देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर प्रहार