विशेष प्रतिनिधी
मुंबई : बेकरी उत्पादन करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण महिलांना प्रोत्साहित करावे. या भागातील पारंपरिक व्यवसायांचा शोध घेऊन त्यांना आधुनिकतेची जोड देत महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. मेघालयाच्या धर्तीवर ‘बॅक हेड पोल्ट्री’चे प्रयोग ठाणे जिल्ह्यात करावेत, अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज झालेल्या विशेष बैठकीत केल्या.Women’s financial improvement is necessary Central minister Kapil Patil’s invocation
बैठकीला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, प्रकल्प संचालक, श्रीमती सिसोदिया, प्रकल्प संचालक श्री. गुंजाळ आणि इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान या राष्ट्रीय कार्यक्रमाचा आढावा घेतला.
ठाणे जिल्ह्यातील सर्व गावात प्रत्येक महिलेचा समावेश करून बचत गटांची स्थापना करून सर्व गावांमध्ये ग्रामसंघाची बांधणी करण्यात यावी. येणाऱ्या काळात सर्व प्रभागांमध्ये नोंदणीकृत प्रभागसंघ स्थापन केले जावेत.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण तालुक्यांना शहरालगत असल्याने दुग्धव्यवसाय करण्याची मोठी संधी महिलांना आहे, यासाठी अभियानाने नेमके प्रयत्न करून महिलांना मदत करावी, महिलांना भाजीपाला विक्री केंद्र उभे करण्यासाठी मदत करावी, अशाही सूचना पाटील यांनी केल्या.
सूक्ष्म उद्योगांमध्ये ठाणे जिल्ह्यातील महिला पुढे राहिल्या पाहिजेत, यासाठीचे प्रस्ताव तयार होऊन केंद्राकडे पाठविल्यास मी स्वतः पाठपुरावा करेन. महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानाचे राज्यातील इतरही जिल्ह्यातील चांगले प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करावेत मी या सर्व प्रस्तावांना मंजुरी मिळण्यासाठी व्यक्तीश: लक्ष घालीन, असेही पाटील यांनी सांगितले.
अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर यांनी राज्यात आणि ठाणे मध्ये अभियानाच्या प्रगतीबाबत माहिती दिली. प्रकल्प संचालक श्रीमती सिसोदिया यांनी आभार मानले.
Women’s financial improvement is necessary Central minister Kapil Patil’s invocation
- पतंगबाजी बेकायदेशीर; दोन वर्षांचा कारावास शक्य मात्र कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सांगणे कठीण
- किरण माने प्रकरणात महिला आयोगाचा हस्तक्षेप रुपाली चाकणकरांनी निर्मात्यांना जाब विचारला
- नानाभाऊ शारीरिक उंचीसोबत बौद्धिक आणि वैचारिक उंचीही असावी, देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांना सुनावले
- अभिनेता सोनू सूदच्या माध्यमातून कॉँग्रेसचा नवज्योत सिंग सिध्दूवर निशाणा, चरणजिसिंग चन्नीच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचे दिले संकेत