• Download App
    आर्मी इंटेलिजन्सच्या लेफ्टनंट कर्नल महिलेने केली आत्महत्या, पुण्यात सुरू होते ट्रेनिंग|women Lieutenant Colonel of Army Intelligence commits suicide, was on training in Pune

    आर्मी इंटेलिजन्सच्या लेफ्टनंट कर्नल महिलेने केली आत्महत्या, पुण्यात सुरू होते ट्रेनिंग

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : आर्मी इंटेलिजन्समध्ये जयपूर येथे पोस्टिंग असलेल्या एका लेफ्टनंट कर्नल महिलेने पुण्यातील आर्मी क्वॉर्टर्समध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. याठिकाणी त्या ट्रेनिंगसाठी आल्या होत्या. पोलिस आणि मिलिटरी इंटेलिजन्स कडून तपास सुरू करण्यात आला आहे.women Lieutenant Colonel of Army Intelligence commits suicide, was on training in Pune

    पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रश्मी आशुतोष मिश्रा (वय 43, रा. देहरादून) असे आत्महत्या केलेल्या लेफ्टनंट कर्नलचे नाव आहे. त्यांना 17 वर्षांचा मुलगा असून तो देहरादून येथे राहतो. त्यांचे वडील निवृत्त कर्नल असून पती आशुतोष हे देखील कर्नल आहेत. मागील काही वर्षांपासून त्यांच्यामध्ये कौटुंबिक वाद सुरू आहेत. यासंदर्भात त्यांनी न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी देखील अर्ज दाखल केलेला आहे.



    रश्मी मिश्रा यांनी त्यांचा मोबाईल समोर ठेवून आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. मात्र या फोन मध्ये रेकॉर्डिंग झाले आहे का हे मोबाईल फोनला लॉक असल्यामुळे समजले नाही. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी कोणाशी फोनवर बोलणे केले होते का किंवा व्हिडिओ कॉल केला होता का हेदेखील तपासले जाणार असल्याचे उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले.

    रश्मी मिश्रा यांची जयपूर येथे पोस्टिंग होती. त्या पुण्यातील आर्मी ट्रेनिंग स्कूलमध्ये सहा महिन्यांचा प्रशिक्षणासाठी आलेल्या होत्या. यातील तीन महिने पूर्ण झालेली होती. त्यांना राहण्यासाठी येथील वन बीएचके क्वॉर्टर्स देण्यात आले होते.

    बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास त्यांना चहा देण्याकरिता नोकर गेला असता रूमचा दरवाजा बंद असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने दरवाजा वाजवला. परंतु, दार उघडले गेले नाही. त्याने वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. मिलिटरीचे अधिकारी आणि पोलिसांनी दार उघडले असता आतमध्ये पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.

    women Lieutenant Colonel of Army Intelligence commits suicide, was on training in Pune

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य