• Download App
    उद्धव ठाकरेंच्या "परवानगीने" अर्जुन खोतकर अखेर शिंदे गटात सामील!!With Uddhav Thackeray's permission Arjun Khotkar finally joined the Shinde group

    उद्धव ठाकरेंच्या “परवानगीने” अर्जुन खोतकर अखेर शिंदे गटात सामील!!

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. जालन्याचे माजी मंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटात सामील झाल्याची घोषणा त्यांनी जालन्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परवानगी घेऊन, त्यांच्याशी चर्चा करूनच आपण शिंदे गटात सहभागी होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. With Uddhav Thackeray’s permission Arjun Khotkar finally joined the Shinde group

    – राऊत, घोसाळकरांशीही चर्चा

    मागच्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील आक्रमक नेते अर्जुन खोतकर हे शिंदे गटात जाणार असल्याची, चर्चा होती. आता त्यांनी स्वत: आपण शिंदे गटाला समर्थन देत असल्याचे, जाहीर केले. यावेळी ते भावूकही झाले. उद्धव ठाकरेंशी बोलणे झाले. सकाळी सविस्तर बोललो. माझ्यावर जी परिस्थिती आली आहे, त्याबद्दल सांगितले.

    मी त्यांच्या कानावर सर्व गोष्टी घातल्या. संजय राऊत, विनोद घोसाळकर यांच्याशी बोललो. मी एक सच्चा शिवसैनिक आहे. 40 वर्षांपासून मी शिवसेनेत आहे. त्यामुळे मला काही निर्णय घेणं भाग होतं. मी या सर्व गोष्टींबाबत पक्षप्रमुखांशी बोललो. काहीतरी परिस्थिती आहे म्हणून मी शिंदे गटात प्रवेश करत आहे, असे खोतकर यावेळी म्हणाले.

    With Uddhav Thackeray’s permission Arjun Khotkar finally joined the Shinde group

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण; कोर्ट SITच्या तपासाची नियमावली ठरणार; प्रकाश आंबेडकर यांची माहिती, सरकारच्या ठरावावर घेतला आक्षेप

    Radhakrishna Vikhe Patil : मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा; मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

    Sunil Tatkare : दिल्लीत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटींचा सिलसिला; अमित शाहांनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, विकासकामांच्या चर्चेचा दावा