• Download App
    बाबासाहेबांच्या निधनाने आपण एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो; सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांची श्रद्धांजली । With the demise of Babasaheb, we released a centenarian Shiva sage; Sarsanghchalak Dr. Tribute to Mohan Bhagwat

    बाबासाहेबांच्या निधनाने आपण एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो; सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांची श्रद्धांजली

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे आपण एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो आहोत, अशा शब्दांत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. With the demise of Babasaheb, we released a centenarian Shiva sage; Sarsanghchalak Dr. Tribute to Mohan Bhagwat

    डॉ. भागवत म्हणतात, की पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त आदरणीय बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने आपण सर्वच एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो आहोत. तरुण वयापासूनच देशभक्तीचा वसा त्यांना संघ शाखेतून प्राप्त झाला. तो ध्यास मनात ठेवून ध्येय प्राप्तीकरिता तत्व रूप आदर्श पुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांची भक्ती त्यांनी जीवनभर निष्ठेने चालविली. दादरा नगर-हवेलीच्या मुक्तिसंग्रामात सैनिक म्हणून ते ही लढले होते.



    छत्रपती शिवाजी महाराजांची कथा आपल्या वक्तृत्वाच्या बळावर त्यांनी घराघरात पोहोचवली. त्यासाठी जीवनभर असंख्य परिश्रम केले. अत्यंत कठीण परिस्थितीतून केलेल्या या वाटचालीतूनच ‘जाणता राजा’ सारख्या भव्य व प्रेरक नाट्य शिल्पाची निर्मिती त्यांनी केली. त्या देशभक्त व परिश्रमी शिवशाहीर यांचे पार्थिव जरी दृष्टीआड झाले तरी त्यांचे स्फूर्तीदायक जीवन समाजामध्ये पिढ्यानपिढ्या शिवरायांचा प्रताप आणि प्रेरणा सतत जागृत ठेवील, अशा शब्दांत मोहन भागवत यांनी पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

    – मोदींची श्रद्धांजली…!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाच्या वृत्तानंतर श्रद्धांजली अर्पण केली आहे. बाबासाहेबांच्या निधनामुळे कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे. बाबासाहेबांच्या निधनाचे दुःख हे शब्दांच्या पलिकडले आहे. बाबासाहेब पुरंदरेच्या निधनामुळे इतिहास आणि संस्कृतिक क्षेत्रामध्ये कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच भविष्यातील पिढ्या छत्रपती शिवाजी महारांजांशी जोडलेल्या राहतील. त्यांनी केलेले इतर कामही कायमच स्मरणात राहील, अशा भावपूर्ण शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

    With the demise of Babasaheb, we released a centenarian Shiva sage; Sarsanghchalak Dr. Tribute to Mohan Bhagwat

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस