Thursday, 1 May 2025
  • Download App
    With fear of ED Inquiry rohit Pawar meet eknath shinde and devendra Fadanavis

    ईडी चौकशीची चाहूल लागताच रोहित पवारांना आपल्या मतदारसंघ विकासासाठी आठवले मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री!!

    प्रतिनिधी

    मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान याच्याशी असलेल्या आर्थिक संबंधांवरून सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी चौकशीची चाहूल लागतात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना आपल्या कर्जत जामखेड मतदार संघातील विकासासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेण्याचे आठवले. With fear of ED Inquiry rohit Pawar meet eknath shinde and devendra Fadanavis

    भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज यांनी रोहित पवारांना राकेश वाधवान याच्याशी संबंधांच्या मुद्द्यावरून सध्या टार्गेट केले आहे. भाजप नेत्यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांचा यावरून उभा दावा सुरू झाला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील आपल्या नातवाच्या मदतीला धावले आहेत.

    या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी आपल्या कर्जत जामखेड मतदार संघाच्या विकास कामांसंदर्भात तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही वस्तू विदेशात आहेत त्या परत आणण्याच्या कामासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही वस्तू विदेशात आहेत त्या परत आणल्या पाहिजेत, हा मुद्दा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना महत्त्वाचा वाटला, असे रोहित पवारांनी या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले. बाकी कोणत्याही विषयावर चर्चा झाली नसल्याचे ते म्हणाले.

    पण आपण पूर्वी संचालक असलेल्या ग्रीन फार्म्स कंपनीच्या ईडी चौकशीची चाहूल लागताच रोहित पवार यांना आपल्या मतदारसंघाचा विकास आठवला. त्यातली कामे आठवली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही वस्तू विदेशात असल्याचे लक्षात आले आणि म्हणून त्यांनी राजकीय मुहूर्त साधून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नेमके आजच्या दिवशी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरात जाऊन पत्रकार परिषद घेऊन शिंदे फडणवीस सरकारला टार्गेट केले. आजोबा आणि नातवाच्या या राजकीय खेळीबद्दलही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

    With fear of ED Inquiry rohit Pawar meet eknath shinde and devendra Fadanavis

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    फडणवीस सरकारने स्वतःच घेतलेल्या परीक्षेत सरकार 78 % गुण मिळवून पास; पण काही विभागांमध्ये नापास!!

    Chief Minister Fadnavis : जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाने सामाजिक न्यायाचे पर्व सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही केले निर्णयाचे स्वागत

    Sarsanghchalak : सरसंघचालकांच्या हस्ते काशीमध्ये मजुराच्या मुलीचे कन्यादान; वराला म्हणाले- माझ्या मुलीची काळजी घ्या!