• Download App
    गोरक्षणाबरोबरच पर्यावरणपूरक मुर्ती पर्यावरण रक्षणाचा कृतिशील संदेश |With cow protection Eco-friendly Ganesh idol

    WATCH:गोरक्षणाबरोबरच पर्यावरणपूरक मुर्ती पर्यावरण रक्षणाचा कृतिशील संदेश

    विशेष प्रतिनिधी

    उस्मानाबाद : गणेशोत्सव आला की अनेकांना पर्यावरणरक्षणाची आठवण होते. पण, वर्षभर पर्यावरणरक्षणासाठी ते काहीच पावले ते उचलत नाही. या उलट उस्मानाबाद जिल्ह्यातील नवजीवन गो शाळेने प्रत्यक्ष पर्यावरणपूरक गणपती तयार करून पर्यावरण रक्षणाचा कृतिशील संदेश दिला आहे.With cow protection Eco-friendly Ganesh idol

    उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्याच्या मंगरूळ येथे नवजीवन गो शाळा आहे. हिंदू संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा दिला जातो . गोरक्षणासोबतच आयुर्वेदात महत्व असलेल्या आणि गोशाळेतील शेण , गोमुत्रापासुन अनेक वस्तु बनवण्याचे काम केले जात आहे.



    पर्यावरणपूरक म्हणजे १० मिनिटात पाण्यात विरघळणारी शेण , गोमुत्र व काळी माती यापासुन बनवलेल्या श्रीगणेश मुर्ती सध्या विक्रीसाठी ठेवल्या आहेत. मातीच्या असल्याने मुर्ती वजनाला जड आहेत. गोरक्षणासोबतच पर्यावरण रक्षणाचा संदेश सर्वसामांन्यांपर्यत पोचवण्यासाठी पुढच्या वर्षी किमान साडेतीन हजार मुर्ती तयार करण्याचा मानस संस्थेच्या वैशालीताई गायकवाड यांनी बोलून दाखवला .

    • मंगरूळ येथील नवजीवन गो शाळेचा उपक्रम
    • गोरक्षणाबरोबरच पर्यावरणपूरक मुर्ती साकारल्या
    • शेण , गोमुत्र व काळी मातीपासून श्रीगणेश मुर्ती
    • मातीच्या असल्याने मुर्ती वजनाला जड
    • मूर्ती केवळ १० मिनिटात पाण्यात विरघळते
    • साडेतीन हजार मुर्ती तयार करण्याचा संकल्प

    With cow protection Eco-friendly Ganesh idol

     

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!