• Download App
    हिवाळी अधिवेशन : विदर्भ-मराठवाड्याला तुम्ही आपलं मानता का; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल । Winter session Do you consider Vidarbha-Marathwada as your own; Fadnavis attacks Thackeray government

    हिवाळी अधिवेशन : विदर्भ-मराठवाड्याला तुम्ही आपलं मानता का; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

    Winter session Do you consider Vidarbha-Marathwada as your own; Fadnavis attacks Thackeray government

    Winter session : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला टीकेची झोड उठवली आहे. ठाकरे सरकारकडून विदर्भ तसेच मराठवाड्यावर अन्यायांची मालिका सुरू असून विदर्भ-मराठवाड्याचा वापर एखाद्या वसाहतीप्रमाणे केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते म्हणाले की, मुळात हे सरकार मराठवाडा आणि विदर्भाला महाराष्ट्राचा भाग मानतात का, हाच प्रश्न पडतो? ठाकरे-पवार सरकारच्या काळात मराठवाडा आणि विदर्भाच्या योजनांना कात्री लावण्यावरून फडणवीसांनी हल्लाबोल केला. Winter session Do you consider Vidarbha-Marathwada as your own; Fadnavis attacks Thackeray government


    वृत्तसंस्था

    मुंबई : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला टीकेची झोड उठवली आहे. ठाकरे सरकारकडून विदर्भ तसेच मराठवाड्यावर अन्यायांची मालिका सुरू असून विदर्भ-मराठवाड्याचा वापर एखाद्या वसाहतीप्रमाणे केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते म्हणाले की, मुळात हे सरकार मराठवाडा आणि विदर्भाला महाराष्ट्राचा भाग मानतात का, हाच प्रश्न पडतो? ठाकरे-पवार सरकारच्या काळात मराठवाडा आणि विदर्भाच्या योजनांना कात्री लावण्यावरून फडणवीसांनी हल्लाबोल केला.

    फडणवीस म्हणाले की, तुम्ही नेहमी सांगता, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची लढाई आपण लढलो. बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, ही घोषणाही देता. यासाठी लढलंच पाहिजे, आपला हक्क मिळेपर्यंत आपण भांडणार. पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की, विदर्भ-मराठवाडा महाराष्ट्रात येतो का? तुम्ही विदर्भ-मराठवाड्याला महाराष्ट्राचा भाग मानता का? हे दोन्ही भाग सरकारच्या खिजगणीतही नाहीत. प्रत्येकवेळी सरकार नागपुरात अधिवेशन घेणार सांगते. मात्र, ते कधीच घेतले जात नाही.

    दरम्यान, फडणवीसांनी विदर्भ आणि मराठवाड्यासाठीच्या वैधानिक विकास मंडळाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. वैधानिक विकास मंडळं ही विदर्भ आणि मराठवाड्याला मिळालेली कवचकुंडलं होती. खूप मोठ्या संघर्षानंतर ही कवचकुंडलं आम्हाला मिळाली होती. विरोधी पक्षात असताना आम्ही या कवचकुंडलांचा वापर करून सरकारला विदर्भ आणि मराठवाड्याचा न्याय द्यायला लावायचो. आम्ही सत्तेत आल्यानंतर या मंडळांना मुदतवाढ देण्यात आली, निर्देशांची पूर्तता केली. मात्र, महाविकासआघाडी सरकारने वैधानिक विकास मंडळांचा मुडदा पाडला. आता कुठलेही निर्देश नाहीत, अनुपालन नाही. या सरकारने विदर्भ आणि मराठवाड्यावर अन्यायाची मालिका सुरू केली असल्याची टीका फडणवीसांनी केली.

    ‘विदर्भ-मराठवाड्यातील योजना ‘स्लो पॉयझनिंग’द्वारे मारल्या’

    फडणवीस पुढे म्हणाले की, भाजप सरकारच्या काळात मराठवाडा आणि विदर्भात उद्योग यावेत, यासाठी वीज सवलत योजना सुरू करण्यात आली होती. त्यानंतर या भागांमध्ये मोठ्याप्रमाणावर उद्योग आले. तसेच विदर्भ-मराठवाड्यासाठी आम्ही नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना सुरू केली. यासाठीचा निधी जागतिक बँकेकडून मंजूर करवून घेतला. त्यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील गावांमध्ये समृद्धी आणण्यासाठी ४००० कोटींचा निधी सॅच्युरेशन पद्धतीने देण्यात येणार होता. यामध्ये प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना पंप, ट्रॅक्टर आणि शेततळ्यासाठी आर्थिक मदत केली जात होती. मात्र, या सरकारने या योजनेच्या निकषांमध्ये असे काही बदल केले आहे की, आता कोणालाही त्याचा लाभ मिळतच नाही. म्हणजे मारायचं नाही, स्लो पॉयझनिंगचा प्रकार सरकारकडून सुरू आहे.

    Winter session Do you consider Vidarbha-Marathwada as your own; Fadnavis attacks Thackeray government

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mumbai soldier : पाकविरोधात लढताना मुंबईचा जवान शहीद; मुरली नाईक यांना उरीमध्ये लढताना वीरमरण

    Neeraj Chopra : आयपीएल नंतर आता ‘ही’ क्रीडा स्पर्धा देखील भारतात झाली स्थगित

    India-Pakistan : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर