प्रतिनिधी
अहमदनगर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रातील ठाकरे – पवार सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे. 14 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाला बसणार असल्याची घोषणा अण्णा हजारे यांनी केली आहे.Wine sales in supermarkets: From Valentine’s Day to Thackeray-Pawar government to Anna The “gift” of fasting
ठाकरे – पवार सरकारने सुपरमार्केट आणि वॉक-इन स्टोअरमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्यानंतर अण्णा हजारे यांनी संतप्त होऊन उपोषणाची घोषणा केली आहे. यासंदर्भात अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी येत्या 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.
ते 14 फेब्रुवारीपासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात आमरण उपोषण सुरू करणार आहेत. त्यामुळे अण्णा हजारे 14 फेब्रुवारीचा व्हॅलेंटाईन डे चा मुहूर्त साधत ठाकरे – पवार सरकारला उपोषणाचे “गिफ्ट” देणार असल्याची चर्चा होत आहे.
नुकतीच ठाकरे – पवार सरकारने सुपरमार्केट आणि वॉक-इन स्टोअरमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिली. त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाईन म्हणजे दारू नव्हे, असा युक्तिवाद केला. तर वाईन पिऊन महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी सरळ चालून दाखवावे, असे आव्हान भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी दिले. वाईन विक्रीच्या निर्णयाचे समर्थन करताना अनेक मंत्र्यांनी वेगळे तर्कवितर्क दिले आहेत.
मात्र, सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ अण्णा हजारे यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. या पत्राला सरकारने अद्याप कोणतेही उत्तर दिले नाही.
अण्णा हजारे यांचे पत्र
सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमधून वाईन विक्री सुरू करणे महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी आहे. केवळ राज्याचा वाढणारा महसूल आणि वाईन उत्पादक आणि विक्रेते यांचे हित पाहून हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. पण या निर्णयामुळे लहान मुले, तरुण व्यसनाधीन होऊ शकतात.
महिलांना त्रास होऊ शकतो याचा विचार सरकारने केलेला दिसत नाही, याची खंत वाटत आहे. युवा शक्ती ही आमची राष्ट्रशक्ती आहे. ती बरबाद करू पाहणाऱ्या निर्णयाला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही. वाईन ही दारू नाही, असा दुर्दैवी युक्तिवाद सरकार करते, हेही आश्चर्यकारक असल्याचे अण्णा हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.
Wine sales in supermarkets: From Valentine’s Day to Thackeray-Pawar government to Anna The “gift” of fasting
महत्त्वाच्या बातम्या
- अनैतिक मानवी तस्करी प्रकरणी कारवाई ; एक महिला दलाल गजाआड ,तीन मुलींची सुटका
- दिल्ली दंगल प्रकरण : दिल्ली हायकोर्ट म्हणाले- हेटस्पीचच्या आरोपींनाही पक्षकार करा; प्रियांका, सोनिया गांधी, ओवैसी यांचीही नावे सामील
- शिवसेना मुंबईची दादा : बाळासाहेबांच्या जे नजरेच्या जरबेत होते, ते संजय राऊतांना तोंडाने का सांगावे लागते??
- #HijabBan ट्विटर वर जोरदार ट्रेंड; हिजाबच्या आडून पुरुषी मानसिकता मुलींवर लादण्याचा प्रयत्न!!